शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व

By admin | Published: October 04, 2015 1:48 AM

ज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख....

- मंदाकिनी भटज्येष्ठ लेखक यशवंत पाध्ये यांच्या निधनाला ३० सप्टेंबर रोजी १ वर्ष झाले. १९७२ सालापासून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख.... यशवंतरावांचा आणि माझा परिचय झाला १९४२मध्ये. मी लेखनिक या नात्याने काही काम आहे का या भावनेतून त्यांना पत्र लिहिले होते; आणि ८ दिवसांतच मला बोलावले गेले. आमचे जुजबी बोलणे झाले आणि कामाला सुरुवात झाली, ती अगदी शेवटचे ‘पंचायतन’ या जुलै २०१४च्या पुस्तकापर्यंत! एवढ्या अवधीत जवळजवळ सव्वा ते दीड लाख पृष्ठांचे काम मी पार पाडले. १९८०पर्यंत झेरॉक्स हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे कधीकधी एकेका लेखाच्या पाच-पाच प्रती याप्रमाणे पन्नास पृष्ठे एका दिवसात ते माझ्याकडून लिहून घेत असत. नंतर झेरॉक्सचा जमाना आला आणि एकाच लेखाच्या अनेक प्रती लिहून घेणे बंद झाले. पण लेखांची संख्या वाढली. त्यांच्या लिखाणामुळे त्यांनी साहित्याच्या बँकेत मात्र ‘बँक बॅलन्स’ अफाट कमावला होता. शेवटचे त्यांचे पुस्तक होते पाच संतांची ओळख करून देणारे ‘पंचायतन’!साहित्य क्षेत्रात यशवंतराव प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे यांना गुरूस्थानी मानत. यशवंतरावांनी आरंभी लेखन केले ते बरेचसे राजकीय, वैचारिक, चरित्रात्मक आणि मुलाखती स्वरूपातले! प्रत्येक लेख हा मागील लेखापेक्षा सरस असायचा. त्या लेखात अनेक बारकावे सहजपणे दाखवलेले असायचे! एकामागून एक जवळजवळ ४०-४५ पुस्तकांतून व्यक्तिचित्रण, राजकारण, धार्मिक, ऐतिहासिक, चिंतनात्मक, सामाजिक, बाल साहित्य असे विषय हाताळले गेले. जीवन समर्थपणे जगणारा लेखक, पत्रकार, स्तंभलेखक, समाजसेवक असा हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘यशवंत’ झाला. त्यांनी गर्व, मोठेपणा, अहंकार याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. त्यांचे हे गुण ‘अर्थप्राप्ती’पेक्षा ‘गुणप्राप्ती’ देऊन गेले. यशवंतराव हे व्यक्तिमत्त्वच असं होतं की ते आपण विसरूच शकणार नाही.