शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अधिका-याकडे पावणेचार कोटींचे घबाड

By admin | Published: March 10, 2015 4:08 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागातील शिपाई महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिलाच प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाखांची

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागातील शिपाई महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिलाच प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाखांची लाच देताना पकडलेले निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्या ऐरोलीतील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी छापा टाकला. या छाप्यात आठ लाख ९२ हजार ३२० रुपयांची रोख व तीन कोटी ६७ लाख ५० हजार १९० रुपयांची मालमत्ता आढळली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय मोहिते यांच्या पथकाने ९ मार्च रोजी दिवसभर त्यांच्या ऐरोलीतील निवासस्थानी तसेच परळी वैजनाथ येथील पिंपळगाव या त्यांच्या मुळगावी धाड टाकून ही मालमत्ता उघडीस आणली. ऐरोलीतील घरझडतीत आठ लाख ९२ हजार ३२० ची रोकड तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ४४ लाख ४३ हजार १८०च्या २ सदनिका याव्यतिरिक्त एक कोटी ६० लाख ७२ हजार ७०६ चे एक सलून आणि दोन गाळयांची कागदपत्रे मिळाली. पिंपळगाव येथे ८ लाख ७० हजारांची एक हेक्टर शेतजमीन, ५३ हजारांचे दोन भूखंड, ऐरोलीच्या एचडीएफसी बँकेतील ४३ लाख ३५ हजारांच्या ठेवीच्या पावत्याही मिळाल्या. वेगवेगळया बँकांत त्यांच्या नावे ८३ हजार ९८४ रुपये जमा असलेले खाते पुस्तक आणि एलआयसीच्या पावत्या अशी तीन कोटी ६७ लाखांची कागदपत्रे मिळाली. तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्य घटनेत कल्याणच्या महावितरण कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.