हितेन नाईक,
पालघर- आॅटोमॅक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विद्युत महावितरण वीज बिलांची भरणा केंद्र उभारुन स्थानिक तरूणा मार्फत या केंद्रांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला. मात्र, प्रत्यक्षात महावितरण कडे पैसे भरणा न करता ह्या कंपनीने पोबारा केला असून ह्या घोटाळ्यात स्थानिक तरूण वितरकांना ६० लाखांचा भुर्दंड भोगावा लागला आहे. या घोटाळ्यात प्रमुख सूत्रधार असलेला पालघर महावितरण कार्यालयातील एक अधिकारी फरार झाला आहे. महावितरणच्या विद्युत ग्राहकांच्या वीज बिलांच्या देयकाची रक्कम आॅनलाइन स्वीकारण्याचा ठेका चेन्नईच्या जी आय टेक्नॉलॉजीस या कंपनीने मिळवला होता. मुंबई च्या मालाड येथील आॅटोमॅक्स टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सब एजंट म्हणून नेमण्यात आले होते. पालघरच्या महावितरणच्या वित्त लेखापाल विभागातील उच्च व्यवस्थापक मनोज जाधव यांनी पालघर जिल्ह्यातील १५ ते १६ तरूणांना आॅटोमॅक्स कंपनीचे फ्रान्चायसी घेण्याचे सुचिवल्याचे तरु णांनी पत्रकारांना सांगितले. या तरूणांनी पालघर, सफाळे, बोईसर,विरार, नालासोपारा, चिंचणी, कासा, खोडाळा इत्यादी ठिकाणी वीज बिल स्वीकारण्याची केंद्रे हि उघडली. यापैकी काही केंद्र महावितरण कार्यालयालगत उघडण्यात आल्याने महावितरणचे मनोज जाधव यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी ह्या केंद्राला अनेक वेळा भेटी हि दिल्याचे काही तरु णांनी लोकमत ला सांगितले.आॅटोमॅक्सच्या स्थानिक उपकेंद्रांनी गोळा केलेला महसूल जून २०१६ मध्ये आॅटोमॅक्सला दिला जाई, आॅटोमॅक्स ती रक्कम जी आय टेक्नॉलॉजीच्या मार्फत महावितरणला भरल्या नंतर ह्या व्यवहारा पोटी स्थानिक केंद्र चालक तरु णांना दोन टक्के रक्कम मिळत असे. हे सर्व काम व्यविस्थतपणे सुरू राहिल्याने खोडाळ्यांतील महावितरण कार्यालयाने आपली बिल स्वीकारण्याची केंद्र बंद करून आॅटोमॅक्स उपकेंद्रांकडे पाठवीण्यास सुरु वात केली.तदनंतर मात्र आॅगस्ट-सप्टेंबर महिन्या नंतर रक्कम भरणा विलंबाने होऊ लागला. याप्रकरणी चौकशी केली असता टेक्नीकल-सर्व्हर मध्ये बिघाड झाल्याच्या कारणा सह सणानिमित्तच्या सुट्ट्या, अपुरे मनुष्यबळ, आॅफीस स्थलांतर अशी कारणे पुढे करण्यात आली. आण ि कंपनीकडून गोळा केलेल्या रक्कमेचा महावितरणकडे भरणा होत नसल्याने उपकेंद्रांनी आॅक्टोबर अखेरीपासून ग्राहकांकडून पैसे गोळा करणे बंद केले.आणि आॅटोमॅक्स कंपनीचे आॅफिस बंद राहू लागले.या उपकेंद्रातील तरु णांनी आॅटोमॅक्सच्या संचालकांच्या मिरारोड येथील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून पाठपुरावा केल्यानंतर वितरकांना आॅटोमॅक्सने चेक दिले; मात्र ते बँकेत न वटल्याने जिल्ह्यातील तरु ण मोठ्या संकटात सापडले आहेत. ह्याच वेळी रक्कम भरण्याचा महावितरणकडून सतत दबाव वाढू लागल्याने ह्या वितरकांनी कर्जे काढून, दागिने गहाण टाकून प्रत्येकी तीन ते पाच लाख अशी सुमारे ६२ लाख रु पयांची रक्कम त्यांना भरावी लागली. या गैर व्यवहारात महावितरणच्या काही अधिकाऱ्यांचा मोठा छुपा पाठिंबा आहे. या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना मात्र अजून यश आलेले नाही. या प्रकरणाचा तरु ण वितरकांवर मात्र दिवसेंदिवस दबाव मात्र वाढत आहे.त्यामुळे पालघरचा वीज बिल घोटाळा प्रकरण आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करून खऱ्या सुत्रधाराना अटक करण्याची मागणी होत आहे. >वितरकांच्या मागे महावितरणचा ससेमिरातरूण वितरकांची मोठी फसवणूक झाली असून वितरकांनी गोळा करून दिलेल्या रक्कमेपैकी सुमारे सव्वा कोटी रु पयांचा भरणाच केला गेला नसल्याने महावितरणचा ससेमिरा त्यांचा मागे लागला आहे.पालघर जिल्ह्यातील या वीज बिल घोटाळ्यासंबंधी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांची आॅटोमॅक्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत १८ नोव्हेंबर रोजी भेट झाली होती. ह्या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी सदर प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असल्याचे कारण सांगून टाळले. तसेच मनोज जाधव हे अधिकारी अनेक दिवसा पासून रजेवर असल्याची माहिती दिली. यामुळे या प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीची मागणी होत आहे.