शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

स्वस्ताईची गाडी पंक्चर !

By admin | Published: January 02, 2015 12:56 AM

उपराजधानीत ३१ डिसेंबरच्या रात्री कमी झालेले पेट्रोल डिझेलचे दर १ जानेवारीला दुपारनंतर पुन्हा पूर्ववत झाले. कुठलीही पूर्वसूचना न देता दरात होणारी वाढ किंवा घट याबाबत अनेकांच्या मनात

पेट्रोलचे दर जैसे थे : काही तासांचा दिलासा कमल शर्मा - नागपूरउपराजधानीत ३१ डिसेंबरच्या रात्री कमी झालेले पेट्रोल डिझेलचे दर १ जानेवारीला दुपारनंतर पुन्हा पूर्ववत झाले. कुठलीही पूर्वसूचना न देता दरात होणारी वाढ किंवा घट याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. यासंदर्भात मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावरही ठोस उत्तर मिळाले नाही. मात्र नागरिकांना स्वस्त पेट्रोल मिळावे अशी खुद्द सरकारचीच इच्छा नाही ही बाब यातून स्पष्ट झाली.राज्य सरकारने शहरातील एकात्मिक रस्ते विकास योजनेतून(आयआरडीपी) रस्ते बांधणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च केले होते. ही रक्कम वसुल करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर २०१२ पासून अतिरिक्त व्हॅट आकारण्यात येऊ लागला. ३१ डिसेंबरला मुदत संपल्याने रात्री १२ वाजता पेट्रोलचे दर ७०.९६ रुपयांवरून ७०.४० रुपयांपर्यंत आणि डिझेलचे दर ६०.९६ रु. वरून ५९.४४ रु. प्रती लिटर कमी करण्यात आले. पण लगेच १ जानेवारीला निर्णय रद्द करून पुन्हा पूर्ववत दर करण्यात आले.माझ्याकडे फाईल आली नाही-अर्थमंत्रीअतिरिक्त व्हॅट वसुलीची मुदत ३१ डिसेंबरला संपल्यावर १ जानेवारीला पेट्रोलचे दर कां वाढले याबाबत माहिती घेऊ, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अतिरिक्त कराची वसुली सुरूच ठेवून ही रक्कम महापालिकेला विकास कामांसाठी द्यावी, अशी मागणी आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. पण अद्याप यावर निर्णय झाला नाही, असे त्यांनी स्ष्ट केले.एकवर्ष आणखी वसुलीराज्य सरकारने कर वसुलीची मुदत ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्ववत करण्यात आले आहे. याबाबत अद्याप अधिसूचना जारी करण्यात आली नसली तरी शुक्रवारपर्यंत ती काढली जाईल,असे विक्रीकर उपायुक्त जी.बी.इंदूरकर यांनी सांगितले. एमएसआरडीसीने ही कर वसुली सुरूच ठेवण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.पैसे मिळाले नाही-एमएसआरडीसीनागपूरमध्ये रस्ते बांधणीचे काम २००२ मध्ये झाले. पण कराच्या माध्यमातून पैसे वसुलीचे काम २०१२ पासून सुरू झाले. आतापर्यंत किती रक्कम वसूल झाली याची माहिती नाही. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वसुली यापुढेही सुरू राहावी, असे रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता समय निकोसे यांनी सांगितले.सरकारचा निर्णय-तेल कंपनी इंधनावर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय हा सरकारचा असतो. त्यावर कंपन्यांचे नियंत्रण नसते, कंपन्या केवळ अंमलबजावणी करतात, असे इंडियन आॅईलचे विभागीय प्रबंधक राजीव गजभिये यांनी सांगितले.विक्रेत्यांना फटका पेट्रोल,डिझेलच्या दरात झालेल्या चढउताराबाबत विक्रेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. एरवी रात्री १२ वाजतानंतर नवीन दर लागू केले जातात.पण यावेळी दुपारीच दरात बदल करण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वा. नंतर झालेल्या विक्रीचा भार विक्रेत्यांवर पडणार आहे.