शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 8:54 AM

आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले.

मुंबई - Ajit Pawar Interview ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात २०१९ नंतर बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. त्यात प्रामुख्याने पवार कुटुंबात अजित पवारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे वादळ उठले. शरद पवार, सुप्रिया सुळे एकाबाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला असं चित्र सध्या बारामतीत आहे. 

यातच गायक अवधूत गुप्ते यांनी अजित पवारांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत गुप्ते यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की,  आज मी माझी राजकीय भूमिका घेतली. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. घरगुती नातेसंबंध हे वेगळे आहेत. आमच्या घरात पहिल्यापासून पाहिले तर आमचे संपूर्ण घराणे शेतकरी कामगार पक्षाचे होते. वसंतदादा पवार हे शेकापचे मोठे नेते होते. कुटुंब शेकापचे काम करत होते. त्यावेळी एक व्यक्ती काँग्रेसचं काम करत होती. कारण त्यांना यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसची विचारधारा पटलेली होती असं अजित पवारांनी सांगितले. झी २४ तासवर ही मुलाखत घेण्यात आली. 

तसेच कुटुंब शेकापचे काम करायचे तर शरद पवार हे काँग्रेसचे काम करत होते. आम्ही लहानपणापासून हे बघितले आहे. घरात प्रत्येकाला व्यक्तिगत आणि राजकीय स्वातंत्र्य आहे. मी वडिलधाऱ्यांचा आदर करत आलेलो आहे. यापुढेही करत राहणार आहे. ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती परंपरा आहे. पण आताच्या घडीला आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत. सर्व नेत्यांनी जो निर्णय घेतला त्याचे समर्थन करावे अशी आमची अपेक्षा होती. इतकी वर्ष आमचे प्रमुख काय सांगतील त्याचे समर्थन आम्ही करत होतो असंही अजित पवारांनी म्हटलं. 

दरम्यान, जुन्या आठवणी काढल्या तर त्या त्या काळातील आहे. आताचा काळ पूर्ण बदललेला आहे.  आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो. जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर शिवसेना-भाजपा यांच्यात फारकाही फरक आहे असं नाही असा दावा अजित पवारांनी कार्यक्रमात केला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारBJPभाजपा