मुंबई : राज्यातील २६ जिल्ह्यांमधील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच इतर ग्रामपंचायतींच्या ८८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने २६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित २२० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी होणार आहे व निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल, असे सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतीठाणे- ३, रायगड- ७, रत्नागिरी- ३३, सिंधुदुर्ग- २, नाशिक- १०, धुळे- १, जळगाव- ६, नंदुरबार- ८२, अहमदनगर- ४, पुणे- ४, सोलापूर- ११, सातारा- ७, कोल्हापूर- ३, औरंगाबाद- ३, नांदेड- ७, परभणी- ४, उस्मानाबाद- २, जालना- ४, लातूर- १, हिंगोली- ३, यवतमाळ- १, वाशीम- ३, बुलढाणा- ३, चंद्रपूर- ७, भंडारा- ४ आणि गडचिरोली- ५. एकूण- २२०.
सरासरी ८१% मतदान
By admin | Published: December 20, 2015 1:44 AM