जमीर काझी, मुंबईकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपास प्रकरणात शासनाच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त होत असताना त्यांच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांची माहिती देण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सार्वजनिक आरोग्य, गृह विभागाबरोबरच पोलीस महासंचालक, मुंबई आणि कोल्हापूर पोलिसांनीही याबाबत आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत हात वर केलेले आहेत. गेल्या सुमारे सात महिन्यांपासून त्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते केस्ली परेरा यांनी पानसरे यांच्यावर कोल्हापूरात हल्ला झाल्यापासून तेथील स्थानिक रुग्णालय व मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करेपर्यंत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व विभागप्रमुखांची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये २७ मार्चला मागितली होती. मात्र आजतागायत त्यांना ती पुरविण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर त्याबाबत गृहविभागाच्या अपिलीय अधिकाऱ्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांच्याकडे होणाऱ्या सुनावणीबाबतचे पत्रही त्यांना निर्धारित तारीख उलटल्यानंतर पंधरा दिवसांनी देण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप परेरा यांनी केला आहे. पोस्ट मार्टमची प्रतदेण्यास टाळाटाळपानसरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीबरोबरच परेरा यांनी त्यांच्या शवविच्छेदनाची प्रत देण्याबाबत स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला होता. मात्र जे.जे. हॉस्पिटलने हे प्रकरण न्यायवैद्यकीय स्वरुपाचे असल्याने माहिती अधिकार अधिनियम ८१ (एच) अन्वये असल्यामुळे देता येत नाही, असे म्हटले. संबंधित तपास अधिकाऱ्यांकडून ही माहिती प्राप्त करुन घेण्यात यावी, असे परेरा यांना ५ आॅक्टोबरला कळविले.
पानसरेंवर उपचार करणाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ
By admin | Published: October 19, 2015 2:31 AM