शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

रुग्णांची गैरसोय टाळा; आवश्यक दक्षता घ्या

By admin | Published: November 11, 2016 2:20 AM

केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अडचणीमुळे कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही

पुणे : केंद्र शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या अडचणीमुळे कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व रुग्णालयांनी घ्यावी. ही परिस्थिती हाताळण्यासाठी रूग्णालयात योग्य व अनुभवी व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी, असे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी काढले आहेत.केंद्राने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या, तरी नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत हॉस्पिटल व औषध विक्रेत्यांनी मात्र या नोटा स्वीकाराव्यात, असे बंधन घालण्यात आले होते. मात्र, तरीही रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. गुरुवारीही अनेक रुग्णालयांमध्ये तसेच औषधाच्या दुकानांमध्ये पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, धर्मादाय आयुक्तांनी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश सर्व धर्मादाय रुग्णालयांना दिले आहेत.गुरुवारपासून बँकांमधून नोटा बदलून मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दररोज केवळ ४ हजार रुपयेच काढता येतील, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे दवाखान्यांची लाखो रुपयांची बिले भरण्यास अडचणी येत आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे भरण्यास अडचण आल्यास त्यांना हॉस्पिटलकडून योग्य ते सहकार्य करण्यात यावे. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच रुग्णांच्या अडचणींचे निराकरण करावे, असे सहधर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.एटीएममधून दिवसाला फक्त ४ हजार रुपयेच काढण्याचे बंधन दूर होईपर्यंत रुग्णालयांमधील पैशांची समस्या कायमच राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रुग्णांना सहकार्य करण्यात यावे, असे धर्मादाय आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मेडिकलमधून औषधेही देण्यास नकारऔषध विक्रेत्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेणे बंधनकारक असताना अनेक मेडिकलमधून सुट्या पैशांअभावी औषधे देण्यास नकार दिला जात आहे किंवा संपूर्ण ५०० रुपयांची खरेदी करण्याची जबरदस्ती केली जात असल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसून आले. औषधविक्रेत्यांकडून होलसेल विक्रेत्यांनीही ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.हजाराच्या नोटा घेतल्याच नाहीतआम्ही सिंहगड रस्त्यावरील धर्मादाय रुग्णालयात गेलो होतो. तेथे आम्हाला रक्ताच्या चाचण्या व एक्स-रे काढण्यासाठी ३० हजार रुपये लागणार होते. आमच्याकडे एक हजाराच्या नोटा होत्या. त्यांनी त्या नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही सुटे पैसे घेण्यासाठी बँकेत गेलो. मात्र, तेथे नोटा कमी असल्यामुळे आम्हाला फक्त एक हजार रुपये मिळाले. एक हजार रुपये घेऊन रुग्णालयात गेलो असता, पूर्ण पैसे भरल्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे रुग्णालयाने सांगितले.- राहुल कुलकुदरे (रुग्णाचे नातोईक, वडगाव)