नागपूर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. यासोबत जवळपास ७५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमीपूजन मोदींनी केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रकल्पांची भेट देताना जनतेचं अभिनंदन तर केलंच पण विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. देशाच्या राजकारणात काही 'शॉर्टकट' पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघड पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं, असं आवाहन मोदींनी केलं.
आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन
"देशातील करदात्यांचे पैसे लुटायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हे लक्ष्य ठेवणारे पक्षच देशाचे सर्वात मोठे शत्रु आहेत. 'आमदनी अठ्ठनी अन् खर्चा रुपया' करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाता अशा वाईट नितीपासून वाचवलं पाहिजे. काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचं काम करत आहेत. शॉर्टकट पक्षांनाही माझं आवाहन आहे की स्थायी विकासाचं महत्व समजून घ्या. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी भविष्याचा विचार होणं गरजेचं आहे. पुढच्या २५ वर्षांच्या विकासाच्या व्हिजननं सरकार काम करत आहे. पण काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचं नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनंच सुरु करावं", असं आवाहन करत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!
"ज्या राजकीय पक्षांचं लक्ष्य फक्त सत्ता आहे. खोटे दावे करुन सत्तेत यायचं आणि करदात्याचे पैसे लुटायचे असे पक्ष देशासाठी काही कामाचे नाहीत. एकेकाळी द.कोरिया देखील गरीब देश होता. पण पायाभूत सुविधांमधील प्रगतीमुळे त्या देशाचं नशीब पालटलं. आज आखाती देश सुद्धा पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून प्रगती साधत आहेत. जगासमोर नवा आदर्श निर्माण करत आहेत. समृद्धी महामार्ग देखील जनतेच्या विकासासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावणारा ठरणार आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे
शिंदे-फडणवीस सरकार येताच कामांना गती"महाराष्ट्रातील विकास कामांचं उदघाटन करताना आज मला आनंद होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाली आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प करताना त्याला ह्युमन टच गरजेचा असतो. समृद्धीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.