मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खास आकर्षण असते, ते तरण तलावांचे. मुंबईत उष्णतेचा पारा चढला असल्याने, तरणतलावात पोहण्यास जाणाऱ्याची संख्या अधिक असते. मात्र, दादर, मुलुंड, अंधेरी, कांदिवली, चेंबूर येथील महापालिकेच्या मालकीचे ५ तरणतलाव विविध कारणांमुळे सध्या बंद आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात मुलांना पोहण्याची हौस भागविता येणार नाही.दोन वर्षांपूर्वी मुंबईत अपुरा पाऊस झाल्याने, पालिकेने सावधगिरी म्हणून २० टक्के पाणीकपात जाहीर केली होती, तसेच या काळात सर्व तरणतलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, वर्षभर तरणतलाव बंद राहिल्याने, त्यांच्या पाणी फिल्टर यंत्रणेत बिघाड झाला आहे. दादरचा महात्मा गांधी तरणतलाव, मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहातील तरणतलाव व शहाजीराजे संकुलातील तरण तलाव हे तलाव बंद पडले आहेत. (प्रतिनिधी)>लवकरच सुरू करणारयाचे तीव्र पडसाद महापालिकेच्या महासभेत उमटले. नगरसेवकांनी तीव्र नाराजी करीत, तत्काळ तरणतलाव उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी सुुरू करण्याची सूचना केला. त्यानुसार, लवकरच हे सर्व तरणतलाव सुरू करण्याचे आदेश देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. >या कारणांमुळे तरणतलावांना टाळेदादर येथील तरणतलावात पाण्याचा दर्जा खराब झाल्याने, मुलुंड येथील तरणतलावातील क्लोरिनेशन यंत्रणा बिघडल्याने, तर अंधेरी येथील तरणतलावातील फिल्टरमध्ये वाळू गेल्याने, गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. दुरुस्तीनिमित्त कांदिवली व चेंबूर येथील तरणतलाव काही वर्षांपासून बंद आहेत.
ऐन उन्हाळ्यात तरणतलावांना टाळे
By admin | Published: April 05, 2017 2:29 AM