संदीप मानकर
अमरावती : डेटिंग ॲपद्वारे सेक्सटॉर्शन अर्थात लैंगिक शोषण वा त्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा नवा ट्रेंड गुन्हेगारी मानसिकतेतून पुढे आला आहे. त्यामुळे अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे शहर सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याला सर्वाधिक तरुण-तरुणी बळी पडत असल्याचे अलीकडच्या काही घटनांमधून स्पष्ट होत आहे.
सायबर गुन्हेगार डेटिंग ॲपवर फेक खाते उघडतात. पुरुष वा महिला पुरुषाला या खात्यावरील व्यक्ती खऱ्या असल्याचे भासते आणि त्यात ते गुंततात. त्यावर चॅटिंग व व्हिडीओ कॉलिंग करून आणि सायबर गुन्हेगारांसमोर नको त्या अवस्थेतील पोज देण्यास बाध्य केले जाते. हे व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात. तसेच स्क्रिनशॉट घेऊन संबंधिताकडून खंडणी उकळण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे समाज माध्यमावर कायम सावध असावे, असे अमरावती सायबर पोलिसांनी सांगितले.मेसेजिंग ॲपद्वारेही होऊ शकते शोषणसायबर गुन्हेगार हे पीडितांना व्हिडीओ आणि ऑडिओ चॅट करण्यासाठी मेसेजद्वारे प्रलोभने देतात. पीडित या सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबदला देतो आणि व्हिडीओ कॉलवर अश्लील पोज देतो, ज्यामुळे सायबर गुन्हेगार त्यांचे व्हिडीओचे रेकॉर्डिंग करतो किंवा स्क्रिनशॉट घेताे. मात्र, त्यानंतर पीडिताला सायबर गुन्हेगाराकडून ब्लॅकमेल केले जाते. यालाच सेक्सटॉर्शन म्हणतात. म्हणून तरुणाईने सावध राहणे गरजेचे आहे.
अनोळखी व्यक्तीला अश्लील छायाचित्रे शेअर करू नकाअनोळखी व्यक्तींनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारणे अश्लील किंवा आक्षपार्ह फोटो आणि व्हिडीओ शेअर करू नका, त्याला वापर सायबर गुन्हेगार हे ब्लॅकमेलिंग किंवा पैशाच्या मागणीकरिता करू शकतात. तुमच्या फोनवर अर्ध नग्न किंवा अश्लील फोटो, व्हिडीओ काढण्याचे टाळा. ते जर लीक झाले, तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. असे पुष्कळ मोबाईल ॲप्स आहेत, जेे तुमच्या मोबाईल गॅलरी, स्टोअरेजपर्यंत पोहोचू शकतात, ज्याचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. लैंगिक शोषण झाल्यास मनात कुठलीही भीती, लज्जा न बाळगता सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. कुठल्याही सोशल मीडियाच्या खात्यावर ‘रिपोर्ट युजर’ असे एक ऑप्शन असते. अशा फेक खात्याची तक्रार करण्यासाठी त्याचा वापर करा, असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले."डेटिंग ॲपद्वारे सेक्सटॉर्शनचा नवीन ट्रेंड गत पंधरा दिवसांपासून पुढे आला आहे. काही मुलींच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र, बदनामीपोटी त्या लेखी तक्रार देण्यास टाळत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना आता सर्तकता बाळगली पाहिजे. कुणाची फसवणूक झाल्यास तातडीने शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा"- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, शहर सायबर सेल