शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

‘एव्हॉन’... नोंदी नाहीत... सारेच संशयास्पद !

By admin | Published: June 21, 2016 4:03 AM

देश परदेशात गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणाचे मूळ केंद्र ठरलेल्या सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील कामगारांसह संबंधितांची ठाणे पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली

विलास जळकोटकर / अमित सोमवंशी, सोलापूरदेश परदेशात गाजत असलेल्या इफेड्रीन प्रकरणाचे मूळ केंद्र ठरलेल्या सोलापुरातील एव्हॉन कंपनीतील कामगारांसह संबंधितांची ठाणे पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. कंपनी बंद असतानाही इफेड्रीनचा साठा बेकायदेशीपणे बाहेर काढून त्याच्या कोठीही नोंदी केल्या नाहीत. ज्यांनी ही बाब निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला त्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला गेल्याची धक्कादायक माहिती ठाणे पोलिसांच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे. या प्रकरणाची तपास अधिकारी ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके रविवारी सोलापुरात आले होते. रात्री उशिरापर्यंत ते एव्हान कंपनीमध्ये ठाण मांडून होते. दिवसभरात त्यांनी कंपनीच्या कामगारांशी, युनियन लिडर यांच्याशीही संवाद साधला. कंपनी बंद काळातही इफेड्रीनचा साठा बाहेर नेण्यात आला मात्र त्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याने हा साराच प्रकार संशयास्पद असल्याचे या चौकशीवरुन स्पष्ट होत असल्याचे शेळके यांनी सांगितले. चिंचोळी एम. आय. डी. सी. परिसरातील ३२ एकर क्षेत्रावर कार्यरत असलेल्या एव्हान कंपनीने मोठी विस्तारीत जागा असतानाही कंपनीपासून एक कि. मी. अंतरावर माल ठेवण्यासाठी भाडेतत्वावर गोडावून घेतले होते. कंपनीमध्ये काय चालते याबद्दल कामागरवर्गासह सर्वच कर्मचारी अनभिज्ञ होते मात्र जेव्हा रातोरात इफेड्रीनच्या निमित्ताने कंपनी चर्चेत आली तेव्हा कामगारांकडून अनेक बेकायदेशीर बाबींची माहिती ठाणे पोलिसांच्या पथकापुढे येऊ लागली आहे.दोन वेळा इफेड्रीनची चोरी२०१४ व २०१५ या वर्षात एव्हॉन कंपनीतून दोनवेळा इफेड्रीनची मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. ही बाब कामगारांनी कंपनी व्यवस्थापनास सांगितली असता कंपनीने यासंबंधी तक्रार दाखल केली नाही. तर दुसरीकडे इफेड्रीनची चोरी कंपनीतील काही मंडळी करीत असल्याचे कामगारांनी नाव सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. मुंबईच्या दारु कंपनीलाविकले अल्कोहोलइफेड्रीनच्या रॉ मटेरियलचा आधार घेऊन तस्करी केलेल्या पुनित श्रृंगी याने अल्कोहोल टँकरवर डल्ला मारला आहे. काही महिन्यांपूर्वी एव्हॉन कंपनीतून एक टँकर भरुन अल्कोहोल मुंबईच्या एका दारु बनवणाऱ्या कंपनीस विकल्याची माहितीही पुढे आली आहे. यातील गौडबंगाल पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.