मुंबई : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. २०१६-१७चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्यांमध्ये किशोर नांदलस्कर (नाटक), पं. उपेंद्र भट (कंठसंगीत), पं. रमेश कानोले (उपशास्त्रीय संगीत), भालचंद्र कुलकर्णी (मराठी चित्रपट), पांडुरंग जाधव (कीर्तन), मधुकर बांते (तमाशा), शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील (शाहिरी), सुखदेव साठे (नृत्य), भागुजी प्रधान (लोककला), सोनू ढवळू म्हसे (आदिवासी गिरीजन) आणि प्रभाकर भावे (कलादान) यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे आहे. २०१६-१७ या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा ४ मार्च २०१७ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथील कलांगण, प्रभादेवी येथे सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच या वेळी संगीत नाटक अकादमीच्या मानकऱ्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
इंद्रायणी पाटील, उपेन्द्र भट यांना पुरस्कार
By admin | Published: March 04, 2017 5:53 AM