शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

भयानक - ठाण्यात एकाच कुटुंबातील १५ जणांची हत्या

By admin | Published: February 28, 2016 6:46 AM

ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

जितेंद्र कालेकर, ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. २८  - ठाणे शहरात काळजाचा थरकाप उडवणारे भीषण हत्याकांड घडले आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे रहाणा-या अन्वर वडेकर यांच्या कुटुंबातील १५ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रात्री दोन ते तीनच्या सुमारास हे हत्याकांड घडले. 

हस्नील अन्वर वरेकर असे आरोपीचे नाव असून, कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. मृतांमध्ये सात मुले, सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हस्नीलने आई-वडिल, पत्नी आणि स्वत:च्या दोन मुलांचीही हत्या केली. मृतांमध्ये हस्नीलच्या बहिणीच्या पाच मुलांचा समावेश आहे. हस्नीलने पद्धतशीरपणे कट रचून हे हत्याकांड घडवल्याची शक्यता आहे. हस्नीलने सर्व बहिणींना घरी जेवणासाठी बोलावले होते. तो स्वत:हा जाऊन या बहिणींना घरी घेऊन आला होता.  
 
या हत्याकांडातून बचावलेल्या सुबिया भरमल या बहिणीच्या गळयावर हस्नीलने सूरा फिरवला होता. मात्र तिने मृत झाल्याचे नाटक केल्यामुळे ती बचावली. हस्नील एकापाठोपाठ एक घरातील सदस्यांची हत्या करत असताना बचावलेल्या सुबियाने गपचुप दुस-या खोलीत जाऊन दरवाजा बंद करुन घेतला.खोलीतील खिडकीमधून तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजा-यांनी तिला वाचवले आणि हे संपूर्ण हत्याकांड उघड झाले.
 
या हत्याकांडामध्ये हस्नीलची बहिण बचावली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावलेल्या बहिणीकडून हत्याकांडाचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने  तपास करत आहेत. संपूर्ण घरभर रक्ताचं थारोळं असून हत्या झालेल्यांमध्ये लहान मोठे सगळ्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ते तपास करत आहेत.  या सगळ्या जणांची हत्या चाकून करण्यात आली. 
 
आरोपीने  गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये चाकू होता. हस्नील इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करणा-या एका कंपनीता कामाला होता. हस्नीलची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह नव्हता असे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. हस्नीलने जेवणामध्ये गुंगीचे औषध मिळवून हे हत्याकांड केले असाही संशय पोलिसांनी व्यक्त केला.
 
ठाणे हत्याकांड, मृतांची नावे
हस्नील अन्वर वरेकर  वय -35 (मारेकरी),  जबीन हुस्नील वरेकर 28 पत्नी, मुबतशिरा हस्नील वरेकर 6 मुलगी, उमेरा हस्नील वरेकर 3 महीने मुलगी, अन्वर वरेकर 65 वडील, असगडी अन्वर वरेकर 55 आई, शबीना शौकत खान 35 बहिण, अनस शौकत खान 12 भाची, सादिया शौकत खान 16 भाची, अलहिसन शौकत खान 5 भाचा, बतूल अन्वर वरेकर 30 बहिण, मारिया अरफान फक्की 28 बहिण, उमेर अरफान फक्की 7 भाचा, युसूफ अरफान फक्की 4 भाचा, आरसिया सोजेफ् भरमल 5 महीने भाची.
 
विडिओ जर्नालिस्टचा  मृत्यू
ठाण्यातील हत्याकांडाच्या चित्रीकरणादरम्यान रतन भौमीक या विडिओ जर्नालिस्टचा  हदयविकाराच्या झटक्याने  मृत्यु झाला. सिविल रुग्णालयात मृतदेहांच्या चित्रीकरणादरम्यान हदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 
 
आरोपी हस्नील वरेकर