दक्षिण भारतातील पॉकेट कार्टुनचे जनक राममूर्ती यांचे ‘मि. सिटीझन’ मागील ३३ वर्षांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत. टेक्कन हेरॉल्ड, प्रजावाणी, सुधा आणि मयुराच्या वाचकांचा दिवस ‘मि. सिटीझन’च्या सामान्य माणसाच्या समस्या आणि विनोदात मनाला भिडणाच्या गोष्टींशिवाय सुरूच होत नाहीत. एकदा त्यांनी आपल्या मुख्य पात्राचा म्हैसुरी फेटा हटवून त्याला टक्कल पडलेले दाखविले. त्यावर वाचकांनी त्यांना लाखो पत्रे पाठविली, यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. शेवटी राममूर्ती यांना ‘मि.सिटीझन’ला पुन्हा फेटा घालावा लागला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्यावर तयार करण्यात आलेले कार्टुन ‘ग्रीन आॅफ द उयर’ने तर त्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर नवी ओळख मिळवून दिली.
बी. वी. राममूर्ती
By admin | Published: May 05, 2016 5:01 AM