शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बा...विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे!

By admin | Published: July 05, 2017 4:35 AM

देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे़ ‘बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे !’, असे साकडे राज्याचे

प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर (जि. सोलापूर) : देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे़ ‘बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे !’, असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाकडे घातले़आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे २़२० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान यंदा बुलढाणा जिल्ह्यातील बाळसमुद्र (ता़ सिंदखेडराजा) येथील परसराम उत्तमराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया या वारकरी दाम्पत्याला मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभराचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, आदी उपस्थित होते़ मुख्यमंत्री म्हणाले, आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो़ वारकरी मजल दरमजल करीत पांडुरंगाच्या ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात़ भक्तिभावाने प्रेरित झालेली ही वारी असते़ भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून, त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल़ याबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडूनच आल्याने पंढरीचा महिमा आता परदेशातही पाहावयास मिळत आहे़ आठ लाख भाविकांची मांदियाळीपंढरीत दाखल झालेल्या सुमारे आठ लाख भाविकांपैकी केवळ तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी विठ्ठलाचे पददर्शन व मुख दर्शन घेतले़ उर्वरित भाविकांनी पंढरीत वारी पोहोचवून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली़़ लोखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांमुळे पंढरपूर भक्तिरसात न्हाऊन निघाले.जीवनातील सर्वात मोठा सन्मानयंदा मुख्यमंत्र्यांसमवेतच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले परसराम मेरत दाम्पत्य गेल्या १० वर्षांपासून वारी करतात़ तीन वर्षांपासून ते माऊलींच्या पालखीसह पायी वारीत सहभागी होतात. त्यांची ३ एकर जिरायत शेती आहे़ आमचे पूर्वजन्माचे काही भाग्य असेल म्हणून जीवनात सर्वात मोठा हा सन्मान आम्हाला मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांनी घेतले कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी श्रीक्षेत्र निरा-नरसिंहपूर येथील कुलदैवत श्री लक्ष्मी-नृसिंहास कुटुंबासमवेत अभिषेक करुन दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्राचिनकालीन माणकेश्वर वाड्यात विकास कामांचा आढावा घेतला.पालख्यांचा मुक्काम पौर्णिमेपर्यंतआषाढी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांचा मुक्काम हा पौर्णिमेपर्यंत पंढरीत असतो़ पौर्णिमेदिवशी गोपाळपूरचा काला झाल्यानंतर या सर्व पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात़ समितीमध्ये वारकऱ्यांचा समावेशआदेशानुसार ३० जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकऱ्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले़सुरक्षा व्यवस्था चोखविठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात़ भाविकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती़ सुरक्षे व्यवस्थेची तयारी आगाऊ करण्यात आली होती़शेगावात दीड लाख भाविकगजानन कलोरे/लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : विदर्भ पंढरी संतनगरी शेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी दीड लाख भाविकांनीश्रींचे समाधी दर्शन घेवून आषाढी एकादशी महोत्सव साजरा केला.श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भक्तांची रांग लांबच लांब रांग लागली होती.श्री गजाननाची पालखी दुपारी २ वा. परिक्रमेकरीता श्रींच्या मंदीरातून निघाली. तत्पुर्वी श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे व श्री विठ्ठलाच्या तैलचित्राचे पुजन केले. त्यानंतर श्रींची पालखी मंदीरातून ढोलपुरी गेट, श्री दत्त मंदिर, जुने महादेव मंदिर, भोईपुरा, श्री शितलनाथ महाराज संस्थान धर्मशाळा, फुले नगर, श्री मारोती मंदीर, आठवडी बाजार, बसस्थानक, व्यापारपेठ मार्गाने मंदिरात पोहोचली. श्रींचे प्रकटस्थळ येथे विश्वस्त गोविंदराव कलोरे तर महादेव मंदीर येथे विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ, मारोती मंदीर येथे विश्वस्त अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. श्रींची पालखी संध्याकाळी मंदीरात आल्यानंतर महाआरती झाली. ८० हजारावर भाविकांना फराळ!श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने एकादशी यात्रेनिमित्त सुमारे ८० हजाराच्यावर भक्तांनी फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला. याकरीता साबुदाणा उसळ १०० क्विंटल, नायलॉन चिवडा ३० क्विंटल, खोबरा खिस २० क्विंटल, साखर २५ क्विंटल आदी साहित्याचा वापर करण्यात आला.