संदीप प्रधान, मुंबईउत्साहवर्धक मुसळी, गर्भवती महिलांना दिली जाणारी गोडंबी, शांत झोप लागणारे तेल अशा वेगवेगळ््या जडीबुटी चूर्ण स्वरुपात वन विभागाच्यावतीने ‘वन-धन’ या दुकानांत उपलब्ध होतील. हे वनौषधींचे पहिले दुकान नागपूरमध्ये याच महिन्यात सुरु होत असून अल्पावधीत महाराष्ट्रात या दुकानांची साखळी उभी केली जाणार आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विशिष्ट पद्धतीच्या बांबूपासून तयार केलेल्या प्यालात रात्रभर पाणी भरून ठेवले आणि सकाळी ते प्यायले तर मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळतो. पायाच्या तळव्यांना एक विशिष्ट वनस्पतींपासून तयार केलेले तेल चोळले तर शांत झोप लागते. अनेक त्वचा रोगांवर प्रभावी औषधे वन विभागाने शोधून काढली आहेत. वन विभागाने तयार केलेल्या या उत्पादनांचे मार्केटींग होत नाही. अनेक उत्साहवर्धक जडीबुटी चूर्ण स्वरुपात वन विभाग उपलब्ध करून देऊ शकते. या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी याकरिता नागपूरमध्ये याच महिन्यात ‘वन-धनह्ण नावाने दुकान सुरु केले जाणार आहे. वन विभागाच्या वनौषधींची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने केलेली आहे. राज्यातील अन्य प्रमुख शहरांत याच नावाने पुढील दोन वर्षांत दुकाने सुरु केली जाणार आहेत. बांबूपासून बनवलेल्या अनेकविध वस्तूही या दुकानात ठेवण्यात येणार आहेत.
बाबांचा बाजार उठणार!
By admin | Published: June 13, 2015 3:28 AM