मुख्यमंत्र्यांची घोषणा : २०१५ सालच्या पुरस्काराकरिता निवडमुंबई : शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व ‘जाणता राजा’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित महानाट्याचे निर्माते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची २०१५ सालच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराकरिता निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निवड समितीने एकमताने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती. अस्सल शिवभक्ताचा गौरव - मुख्यमंत्रीमहाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिनंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.संभाजी ब्रिगेडकडून निषेध... पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे पुण्यातील पत्रकार भवन येथे करणार असल्याची पूर्वकल्पना संभाजी ब्रिगेडला होती. त्यामुळे पत्रकार परिषदेपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे या पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने तावडेंची भेट घेत निषेध व्यक्त केला.
बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण
By admin | Published: May 01, 2015 2:32 AM