वरवंड : येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत नर्सरीजवळ असणारा गाखार बेबी कालवा फुटल्याने पाणी वाया जात आहे. पुण्यातील सांडपाणी हे बेबी कालव्याद्वारे ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी देण्यात येते. काही भागांमध्ये या बेबी कालव्याचा पाण्याचा फायदाही झाला आहे.मागील वर्षी दौंड तालुक्यामध्ये पावसाने चांगलेच रडवले होते. यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतातील पिके जगवणे जिकिरीचे झाले होते. यामुळे वरवंडकरांनी बेबी कालव्यातील पाण्यासाठी बेबी कालव्याला पाणी सोडण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी वरवंडकरांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तसेच ते आंदोलन यशस्वीही झाले व वरवंडकरांना कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बेबी कालव्याचे पाणी मिळाले होते. मात्र, गावखार २५ नंबर फाटा कालवा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नर्सरीशेजारी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)>नक्की पाणी मुरतेय कोठयाबाबत वरवंड येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी व्ही.डी. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाच्या पाण्याने फुटला असेल. आम्ही या बेबी कालव्यामध्ये कोणतेच पाणी सोडले नाही. या अधिकाऱ्यांनी पाणी आमचे नसल्याचे म्हणणे आहे; मात्र वरवंडमध्ये व परिसरात बेबी कालवा फुटेल असा मोठा पाऊस झाला नसल्यामुळे नक्की पाणी मुरतेय कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वरवंडमध्ये बेबी कालवा फुटला
By admin | Published: September 19, 2016 1:11 AM