शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

डिजिटल सातबारामध्ये पुणे जिल्हा मागे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 4:58 PM

पुणे जिल्ह्याने सुरुवातीला सातबारा संगणकीकरणाच्या कामात आघाडी घेतली होती. मात्र, जिल्ह्याची सध्याची कामगिरी नीचांकी असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे१ मे पासून राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्याची योजना सुरू जिल्ह्यातील अकरा तालुक्यात आतापर्यंत केवळ एक लाख १७ हजार सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त

पुणे : सातबारा संगणकीकरण या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महसूल विभागाच्या वतीने डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू केला आहे. पुणे जिल्ह्याने सुरुवातीला संगणकीकरणाच्या कामात आघाडी घेतली होती. मात्र, जिल्ह्याची सध्याची कामगिरी नीचांकी असल्याचे दिसून येत आहे.  शासनाने केलेल्या घोषणेनुसार १ मे पासून राज्यात डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्याची योजना सुरू केली आहे. सातबारा संगणकीकरणात चावडी वाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, आॅनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे केले आहेत. गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात दोन वतुर्ळाकार रस्ते, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोच्या तीन मार्गिका अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील जमिनींना चांगलाच भाव आला. त्याचा फायदा घेवून बांधकाम क्षेत्रातील दलालांनी एक, दोन गुंठ्यांच्या जमिनी गुंतवणूकदारांना विकल्या. त्यामुळे अनेक खातेदार निर्माण झाले आहेत. परिणामी संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, खेड तालुक्यांमधील एका सातबारा उताºयावर शंभरपेक्षा अधिक खातेदारांची नावे आली.परिणामी जिल्ह्यातील तालुक्यांची कामे संथगतीने सुरू राहिली. तुकडा बंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा विकता येत नाही. मात्र, तरी देखील शहरालगतच्या गावांमध्ये जमिनींचे तुकडे करून मोठ्या प्रमाणात विकण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात आतापर्यंत केवळ एक लाख १७ हजार सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले असून त्याची आकडेवारी केवळ १४.६३ टक्के एवढी आहे.पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यात प्रांत, मंडलअधिकारी, तहसीलदार यांना सातबारा संगणकीकरण आणि स्वाक्षरीयुक्त साताबारा उताऱ्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार कामे सुरू आहेत, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.-----------

स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्याची जिल्ह्याची तालुका निहाय आकडेवारी तालुका   चालू सर्वेक्षण क्रमांक       डिजिटल सातबारे               डिजिटल स्वाक्षरीयुक्तजुन्नर         १,५३,५८९                    १०                          ११पुरंदर        १,०५,८११                     १३                           १३वेल्हा         ५४,९१५                     ५,३५२                      ५,३६२भोर           १,११,८८०                    १८                           १९बारामती     ७९,४८७                       १९,८३०                    १९,९०८इंदापूर       ८३,९३७                        १६,७१७                   १६,७१९आंबेगाव   १,१८,३४०                        ०                           ०शिरूर       १,१७,७९३                     ५६९                        ५७१मावळ       ९६,१०७                        २६,८०७                  २६,८११मुळशी      १,२०,८५७                       ४३,६७२                ४३,६७२ दौंड         ८२,०२४                        ४,०१२                      ४०१२ एकूण      ११,२४,७४०                     १,१७,०००                १,१७,१०२

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलonlineऑनलाइनFarmerशेतकरी