पुणे : डिजिटल व्यवहार, शिधापत्रिकेवरील धान्याचा हक्क सोडणे यात पुणेकर आघाडीवर असले, तरी शिधापत्रिकेला आधार जोडण्यात पुणे जिल्ह्याचे पाऊल काहीसे मागे असल्याचे चित्र आहे. आधार क्रमांक जोडणीत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे पुढे आहेत. सरकारी योजना आधार कार्डशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या नुसार शिधापत्रिकेवर नाव असणाऱ्या प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक घेण्यात येत आहे. ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक नसेल, त्यांच्या नावाचे धान्य अथवा केरोसिन त्या प्रमाणात रोखून धरले जात आहे. आधार क्रमांकामुळे योग्य व्यक्तीसच अनुदानित धान्य व केरोसिनचा पुरवठा होणार आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक शिधापत्रिकेवर असल्यास एका शिधापत्रिकेतून नाव वगळले जाणार आहे. पुणे विभागात अंत्योदय शिधापत्रिकेद्वारे १२ लाख ५९ हजार २०८, तर प्राधान्यक्रम शिधापत्रिकेचे १ कोटी ३३ लाख ३८ हजार ७२३ असे १ कोटी ४५ लाख ९७ हजार ९३१ सदस्य आहेत. त्यातील १ कोटी २० लाख ९२ हजार ७३३ सदस्यांचे (८२.८४ टक्के) आधार क्रमांक पुरवठा विभागाकडे नोंदविण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ३३ अंत्योदय व २८ लाख १५ हजार ५९६ प्राधान्यक्रम असे ३० लाख ५९ हजार ६२९ सदस्य आहेत. त्यातील २४ लाख २३ हजार २४१ (७९.२० टक्के) सदस्यांनी आधार क्रमांकाची नोंदणी केली आहे. सातारा जिल्ह्यात १९ लाख ४६ हजार ४०४ लाभार्थी असून, १७ लाख ३६ हजार १७१ (८९.२० टक्के) लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी झाली आहे. सांगलीतील १८ लाख ६७ हजार २९२ पैकी १५ लाख ८० हजार ५९८ (८४ टक्के), तर कोल्हापुरातील २६ लाख २६ हजार ६५३ पैकी २३ लाख ६८ हजार ६७२ (९०.१८ टक्के) जणांच्या क्रमांकाची नोंदणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील २४ लाख ४४ हजार २२९ पैकी १९ लाख ४१ हजार १५६ (७९ टक्के) व सोलापूर शहरातील ४ लाख ५७ हजार ८२७ पैकी ४ लाख २१ हजार ८१६ (९२.१३ टक्के) व्यक्तींची नोंदणी झाली आहे.(प्रतिनिधी)१६ लाख २१ हजार लाभार्थींची नोंदणीपुणे विभागात पुणे शहरातच आधार क्रमांकाची नोंदणी अत्यल्प झाली आहे. शहरात अंत्योदयचे ६७ हजार ७१६ व प्राधान्यक्रम असलेले २१ लाख २८ हजार १८१ असे २१ लाख ९५ हजार ८९७ लाभार्थी अहेत. त्यातील केवळ १६ लाख २१ हजार ७९ (७३.८२) लाभार्थ्यांनी आधार क्रमांकाची नोंदणी केली आहे.
आधार जोडणीत पुणे पडले मागे
By admin | Published: January 29, 2017 4:37 AM