शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

परतीच्या पावसाने गावे झाली टँकरमुक्त!

By admin | Published: October 20, 2016 1:22 AM

जिल्ह्यात चांगला पाऊस पडूनही बारामती, दौैंड व पुरंदर या तालुक्यांतील टँकर सुरूच होते.

पुणे : या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडूनही बारामती, दौैंड व पुरंदर या तालुक्यांतील टँकर सुरूच होते. आॅगस्टअखेर ३५ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील टँकर संपवले असून, आता फक्त बारामतीत एका गावासाठी दोन टँकर सुरू आहेत. या वर्षी मे, जून महिन्यांत जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई होती. १४७ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यात मावळ वगळता सर्वच तालुक्यांत टँकर सुरू करण्याची वेळी प्रशासनावर आली होती. जूनअखेर हे टँकर थोडे कमी होऊन वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र १२८ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन ३५वर आले होते. बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच पाणीटंचाई होती. त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यता असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू होते.३५ टँकर मेअखेरपर्यंत सुरू राहतील अशी शक्यता होती; मात्र सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस सुरू झाला. या पावसाने विशेषत: टंचाईसदृश तालुक्यांवर कृपावृष्टी केली. त्यामुळे येथील पाणीटंचाई कमी झाली. शेतीलाही चांगला फायदा झाला. परिणामी, इंदापूर तालुक्यात ६ आॅगस्ट, पुरंदर तालुक्यातील टँकर ५ आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहेत. आजमितीला जिल्ह्यात फक्त २ टँकर सुरू असून, तेही बारामतीतील एक गाव व ११ वाड्यावस्त्यांवर सुरू आहेत. येथील ४ हजार ६६१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. >जिल्ह्यात सरासरी १०१२.१ मि.मी. पाऊसजिल्ह्यात आजअखेर एकूण १३,१५७.५ मि.मी एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी १०,१२.१ मि.मी आहे. १ जूनपासून हवेली ४०९.८ , मुळशी २,०८४.४, भोर १,८६६.४, मावळ २,३५४.५, वेल्हा १,८२२.४, जुन्नर १,१०९.१, खेड ८००, आंबेगाव ६७९.६, शिरूर ४१९, बारामती ४३८.९, इंदापूर ४६९.५, दौंड ४३२.४ आणि पुरंदर २७१.६ मिलिमीटर पाउस झाला आहे.>खालील गावांमध्ये या दिवसांपासून टँकर बंद झाले आहेत़>तालुकादिनांकआंबेगाव0३ आॅगस्ट भोर0२ जुलैदौैंड२७ सप्टेंबरहवेली0६ जुलैइंदापूर0६ आॅगस्टजुन्नर२६ जुलैखेड२७ जुलैमावळएकही टँकर नाहीपुरंदर0५ आॅक्टोबरशिरूर0४ आॅगस्टवेल्हा२९ जून