मुंबई, दि. 9 - मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. तरीही मुंबईत वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मरिन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटी दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. या मोर्चाला विक्रमी गर्दी झाली असून, आझाद मैदान ते सायनपर्यंतच्या रस्त्यावर विराट गर्दी दिसत आहे. चेंबूरपासून वळवा वाहनेभायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.२० हजार पोलीसमोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरले आहेत. जड वाहनांना बंदीमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतुकीचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 1:19 PM