शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

बॅकस्टेज कलाकारांना राखीव बेड : उद्धव

By admin | Published: February 20, 2016 3:22 AM

भारतात बॉलीवूडप्रमाणेच रंगभूमीला वेगळे स्थान आहे. त्यामुळे या नाट्यभूमीचे वैभव साकारण्यासाठी महाराष्ट्रात या रंगभूमीचे संग्रहालय उभारण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख

बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, ठाणे : भारतात बॉलीवूडप्रमाणेच रंगभूमीला वेगळे स्थान आहे. त्यामुळे या नाट्यभूमीचे वैभव साकारण्यासाठी महाराष्ट्रात या रंगभूमीचे संग्रहालय उभारण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ९६व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद््घाटक उद्धव ठाकरे यांनी केली. या संग्रहालयाच्या रूपाने नाट्यवैभव प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या, अशी सादही त्यांनी नाट्य परिषदेला घातली.नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ही घोषणा केली. शिवसेना या नाट्यभूमीच्या सदैव सोबत आणि पाठीशी असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमच्या महापौरांचा कार्यकाळही अडीच वर्षांचा असतो. त्या कार्यकाळातही काही करायला मिळाले नसल्याची ओरड होते. परंतु, अधिकार केवळ मागून मिळत नाहीत, तर मिळालेले अधिकार गाजवायचे असतात, असा सल्लाही त्यांनी मावळत्या संमेलनाध्यक्ष फय्याज यांना दिला. मोहन जोशी यांच्याकडेदेखील कोणी मागणारे आहे, हे ऐकून बरे वाटले, असेही त्यांनी सांगितले. नाट्यभूमी ही फार वेगळी आहे. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर त्याचे सतत शो होतात. परंतु, नाटकाचे तसे नसते. समोर प्रेक्षक असतो आणि कलाकारांची मानसिकता नसेल तरीही त्याला आपली भूमिका ताकदीने पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांचे कौतुकच करावे लागेल.संमेलनाध्यक्षांपेक्षा उद्घाटकांचाच तोरा !बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्घाटक म्हणून लाभल्याने संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्यापेक्षा उद्घाटकांचाच तोरा अधिक होता. ठाकरे हे व्यासपीठावर लिफ्टने वर आले. त्या वेळी तुताऱ्या व संबल यांचा दणदणाट झाला. त्या वेळी आजी-माजी संमेलनाध्यक्ष हे अगोदरच व्यासपीठावरील खुर्च्यांवर येऊन बसले होते.स्वागताध्यक्ष व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वप्रथम ठाकरे यांचा सत्कार करण्याकरिता लगबग करीत होते. मात्र, उद्धव यांनीच शिंदे यांना संमेलनाध्यक्षांचा प्रथम सत्कार करण्याची सूचना केली. त्यामुळे सर्वप्रथम गवाणकर यांचा सत्कार झाला. शिंदे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई आदी शिवसेनेच्या नेत्यांचे सत्कार केल्यावर मग नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर महापौर व अन्य मान्यवरांचे सत्कार करण्याची जबाबदारी सोपवली गेली.ठाण्यातील मंडळींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नाट्यगृहाची मागणी काही वर्षांपूर्वी केली. त्या वेळी अगोदर महापालिकेची सत्ता द्या, मग नाट्यगृह देतो, असे ठाकरे यांनी सांगितले होते. सत्ता आल्यावर गडकरी रंगायतन उभे राहिले, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिल्यावर वर्षभरात महापालिका निवडणूक असल्याची कुजबुज झाली. उद्धव यांनी मंत्री व पालकमंत्री केल्यानेच स्वागताध्यक्ष झालो, असे सांगत शिंदे यांनी नेतृत्वाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.उद्धव ठाकरे यांनी हे नाट्यसंमेलन भव्यदिव्य केल्याबद्दल शिवसैनिकांना धन्यवाद देतो, असे मत व्यक्त केले व त्यात लाजायचे कशाला, असा सवाल केला. (प्रतिनिधी)