लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडमधील पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयातील जुन्या इमारतीतून होत असलेल्या चोरीचे गूढ शनिवारी तेथे तैनात असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे उलगडले. याप्रकरणी रवी लक्ष्मण प्रभावते (१९) याला अटक केली आहे.अग्रवाल रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील कामकाज बंद आहे. यााचाच फायदा घेत बिगारी काम करणारा रवी व त्याचे तीन मित्र रात्री इमारतीतील खिडक्यांच्या ग्रीलपासून आतील अॅल्युमिनिअमच्या वस्तूंची चोरी करत होते. शनिवारी सायंकाळी ७च्या सुमारास इमारतीतून काही तोडण्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. रात्रपाळीसाठी तैनात मुलुंड पोलीस ठाण्याचे हवालदार नरेंद्र शिंदे यांना याची माहिती मिळाली. न घाबरता त्यांनी एकट्यानेच इमारतीच्या आत प्रवेश केला. भिंतीच्या आड लपून बसलेल्या रवी प्रभावतेला त्यांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. >...आठवडाभरातच खिडक्या, पंखे पळवलेरवी बिगारी काम करत असल्याने लोखंडी सामान तोडण्यात तो माहीर होता. त्यामुळे त्याने अवघ्या आठवड्याभरातच साथीदारांच्या मदतीने त्याने खिडक्या, पंखे, लोखंडी साहित्य काढत ही इमारत रिकामी केली होती. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
पालिका रुग्णालयातील सामान चोराला बेड्या
By admin | Published: May 14, 2017 5:23 AM