नवी मुंबई : बहरीनाथाच्या आगमनाने दिवाळे गावातील दिवाळी सणाला सुरुवात होते. कोळी बांधवांच्या परंपरेत दिवाळे गावातील बहरीनाथाच्या यात्रेला विशेष महत्त्व असून रविवारी बहरीनाथ उत्सव साजरा केला.बहरीनाथाची मूर्ती वर्षभर घारापुरी येथील समुद्रात असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थ होड्यांच्या सहाय्याने समुद्रात मोठ्या काठीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात. त्यानंतर गावातील ग्रामस्थ देवाची स्थापना करतात. देवाच्या दर्शनासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दिवाळे गावात येत असतात. ग्रामस्थांसाठी वर्षांतील सर्वात मोठा सण असल्याने कोळीवाड्यात मोठ्या फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई केली जाते. कोळी महिला देखील पारंपरिक पद्धतीने कोळी नृत्य सादर करतात. पालखी सोहळ्यानंतर सोमवारी विसर्जन केले जाणार आहे. यावेळी संपूर्ण कोळीवाडा विसर्जन यात्रेत सहभागी होतात. वर्षभर कोळी बांधव समुद्रात मच्छीमारी करीत असतात, त्यांचे रक्षण बहरीनाथ महाराज करीत असल्याची प्रतिक्रि या येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.>ग्रामस्थांसाठी वर्षांतील सर्वात मोठा सण असल्याने कोळीवाड्यात मोठ्या फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई केली जाते. कोळी महिला देखील पारंपरिक पध्दतीने कोळी नृत्य सादर करतात.
दिवाळे गावात बहरीनाथाचे आगमन
By admin | Published: October 31, 2016 2:48 AM