राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 12:56 PM2021-04-10T12:56:29+5:302021-04-10T12:58:39+5:30

बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता.

balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation | राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

Next
ठळक मुद्देबाळासाहेब थोरातांचा विखे-पाटील यांच्यावर पलटवारविखे-पाटील यांनी केला होता महाविकास आघाडीवर हल्लाबोलकठोर निर्णय घ्यावे लागतील; थोरातांचा सूतोवाच

संगमनेर: राज्यातील कोरोनाची स्थिती, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन व बेड्सची कमतरता यांवरून भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकरावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. (balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation)

बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. ते पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काय आरोप केले त्याला महत्त्व देत नाही. ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाचा संसर्ग केवळ एकट्या नगरमध्येच नाही तर सर्वत्र हीच परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही, असे थोरात म्हणाले. 

प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी: संजय राऊत

कठोर निर्णय घ्यावे लागतील

राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे थोरात यांनी सांगितले. 

परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

हातावर पोट असलेल्यांची अवस्था बिकट

लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. ज्यांच्या हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट आहे. मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे, असे थोरात यांनी नमूद केले.

मोदींच्या लोकप्रियतेमुळे तृणमूलचा पराभव निश्चित! प्रशांत किशोर यांनी केले मान्य; मालवीय यांचा दावा

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
 

Web Title: balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.