बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:42 PM2021-09-04T15:42:03+5:302021-09-04T15:42:03+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. पण...
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे, कामाचा वाघ आहे. त्यांच्या एवढे काम तेच करू जाणे. पण, लोक काम झाल्यानंतर काम विसरून जातात आणि तुम्ही त्यांच्याशी कसे बोललात हेच लक्षात ठेवतात, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांना दिला आहे. याच वेळी त्यांनी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनाही सल्ला दिला. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Balasaheb Thorat said, Ajit Pawar is the tiger of work; Strict advice given to CM Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. कटू निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पण, मुख्यमंत्र्याला एका दिवसात अनेक विषय हाताळावे लागतात. त्यामुळे, कटू आणि कठोर निर्णय घेताना चर्चा करून मार्ग काढण्यावर त्यांनी लक्ष द्यायला हवे," असे थोरात यांनी म्हटले आहे.
फडणवीसांनी पक्षातही मित्र निर्माण करायला हवेत -
फडणवीसांवर बोलताना थोरात म्हणाले, देवेंद्रजी आणि आम्ही मित्रच आहोत. विरोधी पक्षात असतानाची त्यांची भाषणे मुद्दाम ऐकावी अशीच असायची. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण होती, असे म्हणत, आम्ही तर त्यांचे मित्र आहोतच, पण त्यांनी पक्षातही मित्र निर्माण करावेत, असा सल्लाही थोरातांनी फडणवीसांना दिला आहे.
नाना पटोले यांना आम्ही पक्षाध्यक्ष पदासाठी शोधून काढलेले आहेत, पण... -
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, पटोले यांना आम्ही पक्षाध्यक्ष पदासाठी शोधून काढलेले आहे. ते मेहनतीला नेहमीच तयार असतात, कधी थकत नाहीत. मात्र, त्यांनी थोटा संयम ठेवायला हवा. संयमाची गरज असते, संयमी वृत्तीने गेले तर खूप चांगले होईल. तसेच, थोरातांनी अशोक चव्हाण यांनाही व्यापक होण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांनी या मुलाखतीत विवीध विषयांवर भाष्य केले.
शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...