Maharashtra Politics: “राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा”; राहुल शेवाळेंची CM शिंदेंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 08:01 PM2022-11-16T20:01:31+5:302022-11-16T20:04:15+5:30
Maharashtra News: राहुल शेवाळेंनी भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी का केली? नेमके कारण काय?
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवावी, अशी मागणी केली आहे.
राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे हे दाखवून देऊया
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा. हे राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे असे दाखवून देऊया. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले आहे.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रा कुणाला थांबवण्याचा अधिकार दिला आहे का, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कोणीही थांबवू शकत नाही असेही ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"