शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

नाशिकमध्ये बांधणार बाळासाहेबांचे स्मारक

By admin | Published: September 16, 2015 12:58 AM

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत अपेक्षित प्रगती झालेली नसताना मनसेने मात्र नाशिक महापालिकेच्या माध्यमातून

नाशिक : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत अपेक्षित प्रगती झालेली नसताना मनसेने मात्र नाशिक महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शिवकालीन पुरातन वस्तूंचे संग्रहालय हेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असेल, असे स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या मोबाइल अ‍ॅपच्या लोकार्पण सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मारकाची घोषणा करत बाळासाहेबांप्रति श्रद्धाभाव व्यक्त केला. मुंबई महापालिकेने रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाची संकल्पना मांडल्यानंतर त्याला विरोध झाला होता. राज यांनीही लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून स्मारक उभारण्याची सूचना केली होती. त्याचवेळी नाशिकमध्ये बाळासाहेबांचे स्मारक करण्यासाठी सेनेने आंदोलन केले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे संग्रहालय नाशिकच्या लौकिकात भर टाकेल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)नाशिक महापालिकेचे नवे अ‍ॅप‘नाशिक महापालिकेच्या कामात पारदर्शकता आहे म्हणूनच मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लोकांसमोर आले आहे. यापुढे आणखी चांगल्या गोष्टी शहरात घडतील. नाशिकचे अनुकरण इतरांनीही करावे, यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत,’ असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. नाशिक महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅप्लिेशनच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात महापालिकेचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, संगणकीय कार्यप्रणाली आणि स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाशिक शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांचाही वेध घेतला.