शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

बाळासाहेबांचे स्मारक लाल फितीशाहीत अडकले!

By admin | Published: January 22, 2016 3:48 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले; तरी या स्मारकाबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप कागदोपत्रीदेखील सुरू झालेली नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी पाठवले होते. शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतींना शिवाजी पार्कवर अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत महापौर बंगल्यात पत्र परिषद घेऊन स्मारक उभारणीची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर गेल्या दोन महिन्यात स्मारकाबाबत कोणतीही हालचाल शासकीयपातळीवर झाली नाही.शासनाच्या या दप्तरदिरंगाईबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी आज लोकमतशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे आज जे स्थान आहे त्याचे मोठे श्रेय हे शिवसेनाप्रमुखांनाच जाते. सरकारी लालफितशाहीवर त्यांनी नेहमीच आसूड उगारले आणि आज त्यांचेच स्मारक लालफितशाहीमध्ये अडकले आहे ही दु:खाची बाब आहे. हे स्मारक उभारण्याचा शब्द मुख्ळमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत आदेश निघायला हवे होते. तसे न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. (विशेष प्रतिनिधी)राज यांचा होता विरोधबाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शविली होता. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. महापौर बंगला ही पुरातन वास्तु असून त्याऐवजी अन्यत्र ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली होती............................उद्योगमंत्री देसाई यांनी दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजेय मेहता यांना दिले होते, मात्र शिवसेनेच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेतून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते.बाळासाहेबांच्या नावेनिराधार स्वावलंबन योजनाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. आत्महत्या केलेल्यांच्या विधवांना या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी १०० टक्के कर्ज देण्यात येणार आहे. शासनाची मदत मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबातील विधवांनाच हे कर्ज मिळेल आणि रिक्षा परवानाही दिला जाईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुुटुंबाला शासन एक लाख रुपयांची मदत देते. आॅटोरिक्षासाठी कर्ज घेताना हीच रक्कम हमी म्हणून वापरता येईल.