शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

‘बळीराजा’ची जाळपोळ

By admin | Published: January 04, 2015 11:03 PM

वाठारनजीक आंदोलन : आजपासून गनिमी कावा, शेतकरी संघटना आक्रमक

कऱ्हाड : ऊसदराच्या अनुषंगाने बळीराजा शेतकरी संघटना रविवारी आक्रमक झाली. संघटनेच्यावतीने पुणे-बंगलोर महामार्गावर वाठार ते मालखेड दरम्यान टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळ महामार्गही रोखल्याची माहिती आंदोलकांनी दिली. दरम्यान, अचानकपणे झालेल्या या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनालाही नव्हती. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन २६00 ते २७00 रुपये दर जाहीर केला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी १७00 ते १८00 तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी १५00 ते १६00 रुपये दर जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणेच सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेची आहे. बळीराजा संघटनेने त्यासाठी कारखानदारांना डेडलाईन दिली आहे. ‘बळीराजा’चे नेते पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार-मालखेड मार्गावर आंदोलकांनी गाड्यांचे टायर पेटवून दिले. आंदोलकांनी घोषणा देत शासन आणि कारखानदारांचा निषेध केला. यावेळी अर्धा तास महामार्गही रोखला. पंजाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कऱ्हाडसह सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यांत सोमवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शेट्टींचा इशारा; बळीराजाचे आंदोलन खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथून चार दिवसांपूर्वी ऊसदराबाबत कारखानदारांना योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला होता; मात्र रविवारी कऱ्हाड येथे पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेकडून प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले़ राज्य सरकार, साखर कारखाने आणि साखर आयुक्तांकडून ऊसदराबाबत एक महिन्यापासून कोणताच निर्णय घेतला गेला नसल्याने अखेर ‘आर या पार’ अशी भूमिका घेत बळीराजा पेटून उठला अन् आंदोलन झाले़...अन् बळीराजा पेटलाऊसदराबाबत एक महिन्यापासून कारखानदारांकडून व सहकार आयुक्तांकडून कोणताच निर्णय घेतला गेला नसल्याने अखेर ‘आर या पार’ अशी भूमिका घेत बळीराजा पेटून उठला अन् आंदोलन झाले़ऊसदर आंदोलनाचे यावेळचे स्वरुप गनिमी कावा आहे. सोमवारपासून सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या चेअरमनांना अडवून, त्यांची गाडी फोडून तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे. - पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटना