मुंबई - ऐन दिवाळीत राज्यातील काही भागात सलग दुसºया दिवशी वादळी वाºयासह बेमोसमी पाऊस झाला. स्वाती नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नाशिकला तिघांचा बळी घेतला. पुण्यात सोमवारी धुव्वाधार पाऊस झाला. जालना औरंगाबाद, येथेही अवकाळी तडाखा बसला. साताºयात सलग दुसºया दिवशी अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.पुणे जिल्ह्यात आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. भात पीकाचे नुकसान झाले.नाशिक जिल्ह्यात पावसाने शेतमालासह द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. वीज पडून नांदगाव तालुक्यात महादेव सदगीर व बागलाण तालुक्यात श्ािंटू चौहाण (२९) यांचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यात नाल्याच्या पुरात वामन बस्ते (५५) हे वाहून गेल्याचे समजते. खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने केळी, कपाशीचे नुकसान झाले. पपईच्या बागांना फटका बसला. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांचा शेकडो क्विंटल शेतमाल भिजला.मुंबईसह कोकणात आज पावसाचा इशारामुंबई व आसपासच्या परिसरासह कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात ६ नोव्हेंबर रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश अंशत: ढगाळ राहील. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये बेमोसमी धुवाधार; औरंगाबाद, जालना, साताऱ्यातही पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:58 AM