मुंबई : डान्सबार बंदी करणारा नवा कायदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडला जाईल आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून विधेयकाचा मसुदा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले. ‘डान्सबारसाठी १५ मार्चपर्यंत परवाने द्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले, तरी त्यापूर्वी विधिमंडळाने कायदा करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. तथापि, या अधिवेशनात हा कायदा नक्कीच केला जाईल. डान्सबारसाठी आलेल्या ३५० अर्जांपैकी कोणालाही शासनाने परवाना दिलेला नाही. सरकारने टाकलेल्या अटींची पूर्तता कोणत्याही अर्जात केलेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आर.आर.पाटील गृहमंत्री असतानाही डान्सबार बंदीचा कायदा दोन वेळा रद्दबातल ठरला होता. नवीन कायदा करण्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला संपूर्ण सहकार्य केले होते. आताचे विरोधक मात्र डान्सबारचे राजकारण करीत आहेत,’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
डान्सबार बंदीचा नवा कायदा आणणार
By admin | Published: March 09, 2016 5:34 AM