सोलापूर : आषाढीवारी सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे १० ते १२ लाख वारकरी दाखल होत असतात. वारीतील गर्दी लक्षात घेवून अप्पर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी पालखी सोहळयाच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर आषाढीवारीमध्ये ड्रोन कॅमेरा वापरण्यावर बंदी घातली आहे.पंढरपुरात आषाढीवारी सोहळा ३ ते १७ जुलै दरम्यान भरणार आहे. जिल्ह्यात सर्वच पालखी मार्गावर बरेच टी.व्ही. चॅनेल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आषाढीवारी कालावधीत पंढरपुरात व पालखी मार्गावर ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आषाढी यात्रेत ड्रोन कॅमेऱ्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 3:52 AM