शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शाळांमध्ये जंकफूड विक्रीवर आली बंदी

By admin | Published: May 09, 2017 2:30 AM

शाळांच्या उपाहारगृहांमध्ये यापुढे चिप्स, मिठाई, नूडल्स, केक, बिस्किटेसह जंक फूड विक्रीला ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये यापुढे चिप्स, मिठाई, नूडल्स, केक, बिस्किटेसह जंक फूड विक्रीला ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने आज याबाबतचा आदेश काढला. बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांची शाळांमध्ये विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर असेल. केंद्राच्या महिला व बालकल्याण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना मीठ, साखर व मेदयुक्त पदार्थ वर्जित करण्याबाबत व आरोग्यास लाभदायक असलेल्या पदार्थांचा वापर करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता. या कार्यगटाने केलेल्या शिफारशींच्या आधारे आता शाळांमधील उपाहारगृहांमध्ये विक्रीसाठी बंदी घातलेल्या आणि परवानगी असलेल्या पदार्थांची यादीच महिला व बालकल्याण विभागाने या आदेशात जारी केली आहे. या पदार्थांना परवानगी : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये पुढील पदार्थ ठेवण्याची परवानगी असेल - ज्यामध्ये ऋतुनिहाय भाज्या असतील, अशी गव्हाची पोळी/पराठा एकापेक्षा जास्त धान्याच्या पिठापासून तयार केलेली पोळी/पराठा, भात, भाजी, पुलाव आणि डाळ, भाजी पुलाव, भात आणि काळा चणा, गव्हाचा हलवा सोबत चणा, गोड दलियासोबत नमकीन दलिया भाजी, भात आणि पांढरा चणा, भात आणि राजमा, कढीभात, बलगर गहू उपमा किंवा खिचडी/हिरवे आणि डाळ कट्टू, पायसाम, पपई/टोमॅटो/अंडी, चिंचेचा भात, हिरवे कट्टू, बलाहार पायसम, पपई/टोमॅटो, बंगाली चणे, भात, सांबर, इडली, वडा-सांबर, खीर, फिरनी, दूध/दुग्धजन्य पदार्थ, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी, जलजीरा. या पदार्थांवर बंदी : शाळांच्या उपाहारगृहांमध्ये पुढील पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे - चिप्स, तळलेले पदार्थ, स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले चिप्स, सरबत, बर्फाचा गोळा, शर्करायुक्त कार्बोनेटेड शीतपेय आणि नॉन कॉर्बोरेटेड शीतपेय, रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कलाकंदसह सर्व प्रकारची मिठाई, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणी-पुरी, सगळ्या प्रकारच्या चघळण्याच्या गोळ्या आणि कँडी, ३० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त साखर असलेले पदार्थ जसे - जिलेबी, इमरती, बुंदी आदी, सगळ्या प्रकारचे चॉकलेटस्, केक आणि बिस्किटे, बन्स आणि पेस्ट्री, जाम आणि जेली.