शहरं
Join us  
Trending Stories
1
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
5
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
6
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
7
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
8
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
9
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
10
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
11
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
12
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
13
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
14
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
15
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
16
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
17
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
18
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
19
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
20
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

शिवसेनेबाबत जाहीर मतप्रदर्शनास बंदी

By admin | Published: November 10, 2014 4:31 AM

मंत्रीपदाबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली असल्याने भाजपाच्या आमदारांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवन सोडून जाऊ नये

मुंबई : मंत्रीपदाबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली असल्याने भाजपाच्या आमदारांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन काळात विधानभवन सोडून जाऊ नये तसेच शिवसेनेबाबत प्रसिद्धी माध्यमांकडे कुठलेही जाहीर मतप्रदर्शन करू नये, असे सक्त आदेश भाजपा विधिमंडळ पक्षाने जारी केले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपा आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये सरकार अल्पमतात असून विधानसभा अध्यक्षांची निवड करताना आणि विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेताना मतदान होणार असल्याने भाजपाच्या आमदारांनी पुढील तीन दिवस कुठल्याही परिस्थितीत विधान भवन सोडून जाऊ नये, असे सक्त आदेश देण्यात आले.मंत्रीपदांच्या मागणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम असून त्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र सध्याचा शिवसेनेचा पवित्रा आक्रमक असल्याने यदाकदाचित त्यांची भूमिका विरोधी असू शकते. मात्र जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव संमत होत नाही; तोपर्यंत भाजपाच्या आमदारांनी दूरचित्रवाहिन्या तसेच वृत्तपत्रांकडे जाहीर मतप्रदर्शन करू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.उद्धव यांचा शिवसेनेवरील ताबा सुटला - भाजपाचा निष्कर्षशिवसेनेने मंत्रीपदाकरिता राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांचे नाव निश्चित केल्याने पक्षातील चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ हे ज्येष्ठ लोकसभा सदस्य नाराज झाले होते. देसाई मंत्रीपदाची शपथ घेण्याकरिता दिल्लीत दाखल झाले, तेव्हाच महाराष्ट्राबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत केंद्रात मंत्रीपदाची शपथ शिवसेना घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अडसूळ यांनी देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे खासदारांच्या नाराजीचा स्फोट होईल, या भीतीने शपथविधीपूर्वीच ठाकरे यांनी देसाई यांना परत येण्याचा आदेश दिला, असे मत भाजपा नेत्यांच्या बैठकीत व्यक्त झाले. ठाकरे यांचा शिवसेनेवरील ताबा सुटत असून लवकरच शिवसेनेत नाराजीचा स्फोट होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे. (विशेष प्रतिनिधी)