ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - सनातन संस्थेवर बंदी घालवी अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे. त्या दिवंगत डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या आहेत. दाभोलकर यांच्या हत्येला ३४ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत असल्याचा आरोप मुक्ता दाभोलकर यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणातील साक्षीदारांना योग्य ते सरंक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सरकारने लक्ष देण्यची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. या घटनेकडे पहाण्याचा सरकारचा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढव म्हणाले.या प्रकरणाकड़े सरकारला गांभीर्याने आणि आत्मीयतेने पहायचे नाही. असे असताना प्रबोधनाची चळवळ कशी चलवायची हा प्रश्न आहे. या प्रकरणामध्ये मालेगावसरखा धोका आहे. मुख्यमंत्री याबाबत काही बोलत नाहीत हा खरा प्रश्न आहे. विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लढण्याच्या गोष्टी सरकार करत असेल तर या राष्ट्रीय प्रश्नाचे काय? असा प्रश्न बाबा आढव यांनी उपस्थित केला.