अमरावती, दि. 7 - मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरुवारी दुपारी 2.55 वाजता घडली. ग्राहकाने मनभरीच्या दोन्ही उत्पादनांचे सीलबंद पाकीट येथील अन्न व प्रशासन विभागाकडे नेऊन लेखी तक्रार नोंदविली.रुक्मिणीनगर येथील मेघा निरज चेड या मनभरीच्या राजापेठ येथील फुडमार्टमध्ये गेल्या होत्या. येथून त्यांनी 200 रुपयांचे खाद्यपदार्थ खरेदी केले. मनभरीची गोड नानखटाई व मनभरी जीरा टोस्ट खरेदी केले व त्या घरी आल्या. लहान मुलांना जीरा टोस्ट व नानकटाई देत असताना त्यांना तळलेली मुंगी व केसांचा गुच्छ आढळून आला. त्यानंतर त्यांचे पती नीरज चेडे यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र येते, गौतम देशपांडे, रामभाऊ भायदे यांना सांगितली. त्यांना सोबत घेऊन नीरज चेडे हे सायंकाळी 6 वाजता एफडीएचे कार्यालय गाठले. अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त अन्नपुरे यांना घडलेला प्रकार सांगितला. खरेदी केलेल्या मनभरीच्या खाद्यपदार्थांचे बिल देखील दाखविले. मनभरी चिवड्यात आढळली होती पालयापूर्वी सुद्धा मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळली होती. तत्पूर्वी रघुवीरच्या कचोरीत अळी आढळली होती. ‘मनभरी’च्या उत्पादनांबाबत यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे पदार्थ सेवन करणाºयांच्या आरोग्याला धोका संभवतो. आता जीरा टोस्टमध्ये केसांचा गुच्छ व नानकटाईमध्ये तळलेली मुंगी आढळल्याने या प्रॉडक्ट्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. ‘प्रीमी फुड प्रा.लि.’ चे उत्पादन मनभरीच्या जीरा टोस्टच्या पाकिटात केसांचा गुच्छ आढळला आहे. याचे उत्पादक प्रीमी फुड प्रा.लि.च्या नावाने असून हा कारखाना अकोला मार्गावरील दाभा येथे आहे. उपरोक्त उल्लेख उत्पादनांच्या पाकिटावर करण्यात आला आहे. त्यामुळे एफडीएने याची पारदर्शक चौक शी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एफडीएच्या अधिका-यांनी मेघा चेडे यांना लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. तक्रारीनंतर त्यांनी मनभरीच्या टोस्टचे आणि नानकटाईचे पाकिट जप्त केले. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. यावेळी अन्न व सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे उपस्थित होते. याप्रकाराबाबत एफडीएच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी, जिरा टोस्टच्या पाकिटात केसांचा गुच्छ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 9:55 PM