शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

केला इशारा जाता जाता...

By admin | Published: December 23, 2016 11:41 PM

कारण राजकारण

वर्षाच्या अखेरीस सुरू झालेल्या गारठवून टाकणाऱ्या कडाक्याच्या थंडीत जिल्हा परिषदेतलं राजकारण तापलंय. निवडणुका तोंडावर आल्यानं जो-तो पेटवलेल्या आगीवर हलगी शेकून घेतोय. नगरपालिका निवडणुकांत बारामतीकरांचा फड पेटून घड्याळाच्या काचा तडकल्या असल्या तरी इस्लामपूरकर साहेब अजून त्या काचा सांधण्यासाठी म्हणावे तसे कामाला लागलेले नाहीत. (वरवर तरी तसं दिसतंय...) त्यामुळं साहेबांवर खार खाणारी तमाम मंडळी मोकळं रान मिळाल्यागत भडकलेल्या जाळाला वारं द्यायला लागलीत. सदाभाऊ त्यात उसाची चिपाडं टाकताहेत, तर एकेकाळी साहेबांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कमळाबाईच्या फडातले नवे-जुने वादकही साहेबांच्या विरोधात हलगी घुमवत ढोलकी बडवायला लागलेत!घर फिरलं की, वासेही फिरतात, असं म्हणतात. तद्वत सत्ता गेली की, मागं-पुढं करणाऱ्यांसोबत कट्टर म्हणवणारे कार्यकर्तेही उलटतात. याचा प्रत्यय बारामतीकरांच्या फडात येतोय. या फडाचे जिल्ह्यातले सर्वेसर्वा इस्लामपूरकर साहेब सत्तेत असताना त्यांच्याभोवती घिरट्या घालणाऱ्यांना कमळाबाईनं हळूच डोळा घातला. मग भुललेले फडकरी तिकडं गेले. सत्तेचा सारीपाट उलटला, तरीही परवापरवापर्यंत साहेबांचा वट होता. जणू साहेबच कमळाबाईच्या फड चालवताहेत, असं दिसत होतं. पण शेवटी हेही चित्र बदललं. साहेबांकडून गेलेले फडकरी स्वत:ची ढोलकी बडवू लागले. साहेबांचा वट कमी झाला. त्याची सुरुवात झाली इस्लामपुरातून. उसाच्या फडातून पुढं आलेल्या राजूभाई-सदाभाऊंनी इस्लामपुरात नवा फड उभा केला. मंत्रीपद मिळाल्यावर सदाभाऊंनी कमळाबाईच्या मदतीनं नव्या फडाच्या कनाती वर घेतल्या. मग साहेबांची जिरवण्यासाठी सगळे फडकरी त्या फडात घुसले. त्यात शिराळकर, पेठनाक्यावरचे येलूरकर, ‘धनुष्यबाण’वाले, ‘हात’वाले यांचा जमाव मोठा होता. तिथल्या ढोलकीचा कडकडाट ऐकून साहेबांनी स्वत:च्या फडाभोवती मजबुतीनं बांधलेल्या कनाती फाडून इस्लामपुरातलं ‘पब्लिक’ बाहेर आलं आणि ते नव्या फडाकडं पळालं. हा ‘शो’ हाऊसफुल्ल जाताच आता जिल्हा परिषदेचा हंगाम मारण्यासाठी तयारी सुरू झालीय. इस्लामपूरचा तुफान यशस्वी झालेला वग पुन्हा ‘पब्लिक’समोर आणण्याचं घाटतंय. या फडाला ‘हात’ देणार असल्याची दवंडी सोनसळकर आणि सांगलीकरांनी आधीच दिलीय. आता त्यात कमळाबाईच्या फडात नव्यानं गेलेले आणि इस्लामपूरचा वग लांबून बघणारे तासगावकर काका, जतकर साहेब मिसळलेत.जिल्हा परिषदेत इस्लामपूरकर साहेब आणि आबांच्या शिलेदारांची सत्ता आहे. अध्यक्षपद तासगावकडं. त्यामुळं आबांच्या स्मरणार्थ जतला कृषी प्रदर्शन भरवायचा निर्णय झाला. त्यासाठी दहा लाखाची बिदागी द्यायचं ठरलं. पण सारं प्रदर्शन कमळाबाईच्या फडातल्या तासगावकर काका आणि जतकर साहेबांनी ‘हायजॅक’ केलं. (अलीकडं इस्लामपूरकर साहेबांचा इशारा ते जुमानत नाहीत म्हणे!) जिल्हा परिषदेच्या कृषी-पशुसंवर्धन समितीचे सभापती हे बोलूनचालून जतकर साहेबांचे साथीदार. त्यांनी निमंत्रण पत्रिकेवरून आबांचा फोटोच उडवला. नाव घातलं पण ते दिसणारं नाही असं. (काका आणि जतकरांचा आबांशी छत्तीसचा आकडा होता. अगदी ते तिघं बारामतीकरांच्या फडात असतानाही! त्यामुळं हे घडणार होतंच.) सभापतींनी काकांचा मोठ्ठा फोटो वापरला आणि त्याशेजारी जतकर साहेबांचा. इस्लामपूरकर साहेबांचा मात्र छोटासा फोटो पत्रिकेवर टाकला गेला, तेवढंच! तिकडं जतला प्रदर्शनाच्या गेटवरही आबांऐवजी काका आणि जतकर साहेबांची हसरी छबी झळकत होती. ते कळताच आबांचे शिलेदार भडकले. त्यावर सभापतींनी पत्रिका बदलल्या म्हणे... पण त्या निमंत्रितांपर्यंत पोहोचल्याच नाहीत! संतापलेल्या शिलेदारांनी इस्लामपूरकर साहेबांच्या इशाऱ्यावर प्रदर्शनावर बहिष्कार टाकून दहा लाखाची बिदागी रोखली. सभापतींचा राजीनामा घेण्याचा आग्रह झाला. सांगलीत आबांच्या नावानं दुसरं प्रदर्शन भरवण्याचं ठरलं. सभापतींनी सारवासारवी केली आणि तासाभरात जतला प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर आबांचा मोठ्ठा फोटो लागला (नव्हे चिकटवला)! खुद्द सभापतींनी तसं कळवलं, पण भात्यातून बाण निसटला होता... तासगावकर काका आणि जतकर साहेबांनी इस्लामपूरकर साहेबांची साथ सोडल्याची ही निशाणी होती...हा जाळ दिसताच सदाभाऊंनीही हलगी शेकून घेतली. जतला उद्घाटन समारंभात इस्लामपूरकर साहेबांच्या विरोधात ती वाजवली. काका आणि जतकर साहेबांनाही त्यांनी पेटवलं. दोघं आधी आबांबर घसरत होते. आता ते थेट साहेबांवरही बरसले! जतच्या वाट्याचा निधी आबांसोबत साहेबांनीही पळवल्याचं गुपीत त्यांनी फोडलं! पुढं गाठ आपल्याशी असल्याचा इशारा द्यायला दोघंही विसरले नाहीत. त्याचवेळी सदाभाऊ खुदकन् हसले... आणि त्यांनी प्रदर्शनासाठी खास कोट्यातून बिदागी जाहीर केली..!जाता-जाता : राजूभाई आणि सदाभाऊंचा इस्लामपूरमधील वग यशस्वी झाल्यानं मौजे डिग्रजला त्यांच्या मेळ्यासाठी गर्दी झाली होती. तिथं ‘हात’वाले (सोनसळकर -सांगलीकर) आणि ‘धनुष्यबाण’वाले (संभाजीआप्पा) त्यांना मिळाले. कमळाबाईच्या फडात साहेबांनीच पाठवलेले फडकरीही आता विरोधातली ढोलकी बडवणार, असं दिसतंय. तसा इशाराच जत प्रकरणानं दिला नाही का..?ताजा कलम : साहेबांचे ग्रह हल्ली बरे नाहीत, असं म्हणतात. परवा तर तात्यांनी (कोणते तात्या, हे सर्वांना माहीत आहे.) साहेबांकडं पत्रिका (कुंडली हो!) मागितली म्हणे. ती जाणकाराला दाखवून ग्रहदशा सुधारण्यासाठी काय करता येईल, याचा सल्ला घ्यायचा विचार तात्यांनी बोलून दाखवला. कमळाबाईच्या फडातल्या पृथ्वीराजबाबा आणि काकांनी जिल्ह्यात लवकरच राजकीय भूकंप घडवण्याचं भाकीत केलंय, त्याची मूळं तात्यांच्या या म्हणण्यामागं नसावीत ना?                                                                                                                                              --श्रीनिवास नागे