शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
3
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
4
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
5
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
6
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
7
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
8
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
9
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
10
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
11
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
12
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
13
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
14
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
15
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
16
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
17
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
18
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
20
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?

बँड, बाजा, बारात... सारंच आउटसोर्सिंग

By admin | Published: November 10, 2014 12:38 AM

विवाह सोहळा, ‘नो टेन्शन’ : लग्नपत्रिका, भटजी, वरातीपासून पाठवणीपर्यंतच्या सर्व सेवा

इंदुमती गणेश - कोल्हापूरमंगल कार्यालयाची तारीख मिळाली नाही, वरातीचा घोडा बुक आहे, हॉलची सजावट कोण करणार?... जेवणाचे सगळे साहित्य आचाऱ्याला दिले की नाही, रुखवतातील एक वस्तूच आणायची राहिली... मानपान, रुसवे-फुगवे या ताणतणावात कुटुंबीयांना आपल्या लाडक्या मुला-मुलीच्या विवाहाचा आनंदच घेता येत नाही. आता मात्र कुटुंबीयांची ही जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी पेलली आहे. लग्नपत्रिकेपासून भटजी, सजावट, वरात, व्हिडिओ शूटिंग-छायाचित्र, जेवणावळी ते पाठवणीपर्यंतच्या सगळ्या सेवा यात पुरविल्या जातात. त्यामुळे आता कुटुंबीयांनी फक्त विवाह सोहळ्याचा आनंद लुटायचा.तुलसी विवाहानंतर आता दोन मनं, कुटुंबं आणि संस्कृतीचे मिलन घडविणाऱ्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. ‘लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून’ अशी एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की, या काळात जो काही खर्च होतो किंवा जी काही धावपळ करावी लागते, त्यातून आपल्या गाठीशी अनेक चांगले-वाईट अनुभव बांधले जातात. लग्न पार पडेपर्यंत दोन्ही बाजूंच्या मंडळींचा जिवात जीव नसतो. त्यामुळेच हा ताण हलका करण्यासाठी गेल्या काही वर्षांत ‘वेडिंग आॅर्गनायझर’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय होत आहे.सबकुछ... इव्हेंट मॅनेजमेंटइव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला एकदा आपले बजेट, अपेक्षा, सोहळ्यातील विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची संख्या सांगितली की त्यानुसार लग्नाचे नियोजन केले जाते. कमीत कमी दीड लाख रुपयांपासून हे कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. ग्राहकाला उत्तम सेवा हे ब्रीद ठेवून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या काम करीत असतात. त्यामुळे आपण फक्त आदल्या दिवशी मंगल कार्यालयात जायचे आणि जिवलगांचा विवाह सोहळा डोळ्यांत साठवायचा. मात्र, काहीवेळा कुटुंबाला या कंपन्यांच्या भोंगळ कारभारालाही सामोरे जावे लागते; त्यामुळे कंपनीची विश्वासार्हता जोखूनच आपल्या विवाह सोहळ्याची जबाबदारी सोपविणेच योग्य ठरते, अन्यथा मनस्तापच सहन करावा लागतो. पुरीभाजी आउटडेटेडपूर्वी लग्न म्हटले की श्रीखंड किंवा फार तर गुलाबजामुन, पुरी, भाजी, मसालेभात, भजी असा ठरलेला मेनू असायचा. आता मात्र हे पदार्थ हद्दपार होऊन त्यांची जागा पनीर टिक्का, मिक्स व्हेज, दाल तडका, कश्मिरी पुलाव, व्हेज हैदराबादी, भजीऐवजी कटलेट, रोल कटलेट. गोड पदार्थांत गाजर-दुधी हलवा, रबडी, फ्रुटखंड, बासुंदी, रसमलाई, रसगुल्ला यांची वर्णी लागली आहे. याशिवाय जेवणासोबत सॅलड, आइस्क्रीम, लहान मुलांचा खाऊ, पंजाबी-साउथ इंडियन डिशेस, आलेल्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक अशा नवनवीन पदार्थांची मेजवानी दिली जात आहे. आता लग्न सोहळ्याला पुरी-भाजीऐवजी पंजाबी, हैदराबादी अशा विविध प्रकारच्या मेनूची मागणी केली जाते. याशिवाय स्वच्छता, सर्व वाढपी ड्रेस कोडमध्ये यावर विशेष भर दिला जातो. विवाहाचे मुहूर्तच इतके असतात की, अनेकदा आम्ही एका दिवसात दोन लग्नांना केटरिंगची सेवा पुरवितो. - सादिक काले (फुडताज केटरिंग सर्व्हिस)काळानुसार विवाह सोहळ्याचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे आपले कार्य अधिक देखण्या व शिस्तबद्ध रितीने व्हावे, या दृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंटला अधिक महत्त्व आहे. आम्ही हॉलपासून भटजी, वाजंत्री, नववधूचे आगमन या सगळ्या सेवा पुरवितो. ग्राहकांच्या अपेक्षा आणि बजेटनुसार सोहळ्याचे नियोजन केले जाते. -मिलिंद अष्टेकर (ओंकार इव्हेंट्स)पंचांगानुसार दिलेल्या विवाह मुहूर्तांव्यतिरिक्त काढीव मुहूर्तांवरही मोठ्या प्रमाणात लग्ने लावली जातात. बहुतांश लग्नांत मुहूर्तावर अक्षता पडतच नाहीत. पाहुणेरावळे, मुला-मुलीचे मामा किंवा तयारी या सगळ्यांत किमान पाच-सात मिनिटे मुहूर्त पुढेच गेलेला असतो. त्यामुळे शुभ दिवस किंवा मुहूर्त हे आपल्या मानण्यावर असते. - शशिकांत स्वामी (पुरोहित)‘वेडिंग आॅर्गनायझर’ संकल्पना होतेय रूढनव्या संकल्पनेमुळे कुटुंबाला सोहळ्याचा आनंद घेता येतो.इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला आपल्या फक्त अपेक्षा, बजेट सांगाकिमान दीड लाख रुपयांपासूनकान्ट्रॅक्ट दिले जाते.आपण फक्त आदल्या दिवशी कार्यालयात जायचे, अन् सोहळा डोळ्यांत साठवायचा.