शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

काही घटना आणि त्यामागचे ‘बावटे’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 7:29 AM

सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे?

- अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, माजी शालेय शिक्षणमंत्रीकाही छोट्या घटना आजूबाजूला घडतात, त्याची यादी केली की, त्या सर्व घटनांचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात. माझ्या मतदारसंघातील एका घटनेची उकल आपल्यापुरती करता यावी म्हणून मी गेल्या काही दिवसांतील काही घटनांची नोंद एकामागोमाग केल्यावर काही शंकांचे उभे, आडवे, डावे धागे मनात निर्माण झाले, ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच हा अक्षरप्रपंच.. अर्थात पोलिसांचे काम पोलीस करतीलच.माझ्या मतदारसंघातील बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अचानक हजारो मजुरांचा जमाव टाळेबंदीत जमा झाला. पोलिसांसोबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम, नाका कामगारांचा जमाव भुकेचा गोळा पोटात घेऊन रस्त्यावर आला, ही बाब सरकारच्या नंतर निदर्शनास आलीच.मी त्यानंतर काही जणांशी त्यापैकी संवाद साधला. त्यावेळी मला मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) या संघटनेचे पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात निदर्शने केली; पण सरकारकडून दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. म्हणजे स्वयंप्रेरणेने हा जमाव आला नव्हता.हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. मोंटेरियो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरविले. जानेवारीमध्ये ज्या कामगार संघटनांनी भारतबंद पुकारला, त्यातील ही एक संघटना ‘सीआयटीयू...’

या घटनेच्या दिवशी सकाळी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी ‘एनआयए’कडे आत्मसमर्पण केले. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? कदाचित नसेलही किंवा असेलही... जर असेल तर मग या घटनेचा ‘एल्गार’ बराच दूरपर्यंत असू शकतो. त्यानंतर ‘सीपीएम’च्या मतदारसंघातील कासा या भागात १६ एप्रिलला रात्री साधूंना जमावाने ठेचूनमारले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले ते मान्य; पण अटक केलेले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? बांद्रा किंवा पालघर या घटनांमध्ये वरवर दिसणाऱ्या कामगार, मजूर, आदिवासी या भयभीत चेहऱ्यावरूनच फक्त या घटनांची उकल होणार की, त्यांच्या डोक्यात जाळ पेटविणाऱ्यांपर्यंत पोहोचणार? घटनांच्या मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचणार का? पोहोचले तर मग राज्य शासन त्यामागचे खरे चेहरे समोर आणणार का? तसं हे सरकार करणार नाही, अशी आम्हाला भीती आहे. म्हणून या दुर्दैवी घटनांबाबत बोलावं लागतं. अशा घटनांबाबत राज्य सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘एल्गार’चा तपास एनआयएकडे सोपविताना काय घडले? ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ कोण म्हणाले? त्या देशविरोधींचे रक्षणकर्ते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद व्हाया बांद्रा ते पालघर.. सगळ्या घटनांची तारखेनुसार यादी केली, तर पांढऱ्या कागदाचा ‘लाल बावटा’ कसा होतो? शर्जिल इमाम काय म्हणत होता...? उर्वशी चुडावालाच्या नेतृत्वात काय घोषणा दिल्या? गेट वे ऑफ इंडियाच्या आंदोलनात महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री कसे? ‘आझाद काश्मीरचा’ नारा देणारी मेहक प्रभू कोण? या आंदोलनाला अन्न-पाणी पुरविणाऱ्या गाड्यांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कुठल्या बावट्याची तरुणाई कुणी बोलावली? उमर खालीद मुंबईत काय गेट ऑफ इंडियाला फिरायला आला का? त्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री काय त्याला वडापाव घेऊन गेले का? कन्हैया कुमारने मुंबईत कुठला बावटा फडकविला? हार्दिक पटेलने कुणाचा प्रचार केला?
अशा प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला द्यायची नसावीत. म्हणून बांद्र्यातील घटनेमागचा ‘बावटा’ उघड होईल का? अशी भीती वाटते. या शक्तींचे स्लिपर सेलचे धागेदोरे गडचिरोलीचे जंगल ते कासा, पालघरपर्यंत आहेत की काय?, गृहमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविले, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पोसलेले शहरी नक्षलवादी समोर आणले.बांद्र्यातील घटनेनंतर अशा घटना कागदावर उतरवू लागलो, तर यादी वाढतच गेली. देशातील गेल्या सहा वर्षांतील भली मोठी यादी तयार झाली. जेएनयूमध्ये त्याचा केंद्रबिंदू, तर कधी फिल्म बोर्डात, कधी पुणे विद्यापीठात अशा सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे? ‘दया कुछ तो गडबड है!’ एनआयएकडे शरणागती पत्करली? त्यानंतर बांद्रा, पालघर.. ‘दया कुछ तो नक्की बडी गडबड है!! अब पोलिस को ही ‘सवाल का दरवाजा’ तोडना पडेगा!!’

टॅग्स :LynchingलीचिंगNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे