नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारल्यामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात संप पुकारला आहे. शिवाय वेतन कराराला होत असलेला विलंबही यामागे आहे. एका आठवड्यातील कमी कालावधीतील हा दुसरा संप आहे.
सरकारी बँकांच्या अधिकारी संघाने मागील शुक्रवारी संप पुकारला होता. विलिनीकरण आणि वेतन कराराबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी त्यांनी संप केला होता. आज पुन्हा संघटनांनी संप पुकारला असून खासगी बँकांची सेवा सुरळीत सुरु राहणार आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली होती.