लोकमत न्यूज नेटवर्कचोपडा (जि.जळगाव) : नोटा बंदीच्या काळात शेतकऱ्यांचा पैसा सहकारी बँकेत अडकला, तो अद्याप बदलून मिळालेला नाही. त्याचा परिणाम पीक कर्जावर होत असून केंद्राने सहकारी बँकांचा अडकलेला पैसा मोकळा करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील प्रताप विद्या मंदिरात आयोजित कृतज्ञता सोहळ््यात ते अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अरूणभाई गुजराथी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, अरुणभाई हे कोणतेही काम अभ्यासपूर्ण करतात. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, राज्यात दूधाचा एकच ब्रॅन्ड असावा, यासाठी शरद पवार व मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. खान्देशने माझ्यावर भरपूर प्रेम केलेज्यांना शरद पवार यांनी कामाची पावती दिली तो मोठा माणूस समजावा. माझे जीवन कुटंबाप्रमाणेच शरद पवारांनी घडविले. चोपड्यासह खान्देशने माझ्यावर भरपूर प्रेम केले. माझे जीवन एक पुस्तकाप्रमाणे आहे.- अरुणभाई गुजराथी, माजी अध्यक्ष, विधानसभा अरुणभाईंचे व्यक्तिमत्व कर्तृत्व अन् नम्रतेचा संगमअरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक व्यक्तिमत्व आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुणभाई गुजराथी यांचा गौरव केला.मी, अरुणभाई एका वर्गातगुजराथी यांनी नगराध्यक्ष ते विधानसभेचे अध्यक्ष या सर्व पदांवर उत्तमरित्या काम केले. विनम्रता, संयमशिलता, अभ्यासुवृत्ती या गुणांच्या बळावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल आहे. पुण्यात मी आणि अरुणभाई एका वर्गात होतो. नगरविकास मंत्रालयाचे काम सांभाळत असताना अरूणभार्इंनी उत्तम काम केले. त्यांच्या कामावर कधीच आक्षेप घेता आला नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सहकारी बँकांमध्ये अडकलेला‘तो’ पैसा मोकळा करावा
By admin | Published: May 30, 2017 4:01 AM