लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोटबंदीनंतर बँक ग्राहकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष देत त्या सोडविण्यात याव्यात या मागणीसह बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी संसदीय अर्थ समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांच्याकडे केली. निरुपम यांनी मोईली यांची भेट घेत त्यांच्याकडे विविध समस्यांचा पाढा वाचला. नोटबंदीनंतर बँकिंग क्षेत्रात मोठे फेरबदल झाले. याचा मोठा फटका ग्राहकांंना बसला. बँकिंग क्षेत्रातील बदलत्या कायद्याचा ग्राहकांना मनस्ताप झाला आहे. या मागण्यांची मोईली यांनी दखल घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे २५ मे रोजी आरबीआय गर्व्हर्नरसोबत होत असलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येईल, असे आश्वासनही मोईली यांनी निरुपम यांना दिले. शिष्टमंडळात बँक ग्राहक संघटना, एनजीओ आणि बँक युनियनचा समावेश होता.
बँकिंग क्षेत्राच्या समस्या सोडवणार- मोईली
By admin | Published: May 14, 2017 4:48 AM