सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजसाहेब चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते़पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केला आहे़ या सरकारला शेतकºयांची कधीच काळजी नाही़ २००० उद्योगपतीचे १ लाख ४० हजार कोटीचे कर्ज सरकारने माफ केले़ तेव्हा कुठे त्यांचा फॉर्म भरून घेतला होता़ भरून घेतला असेल तर तो दाखवावा़ आणि इकडे मात्र शेतकºयांची छळवणुक करीत आहेत़ तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला़-----------ऊस दराच्या आंदोलनात उतरणारपश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा पट्टा आहे़ या परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़ शेतकरी संघटना आपापसात भांडण्यात व्यस्त आहेत़ त्यामुळे ऊस उत्पादकांची परवड होऊ नये यासाठी आ़ बच्चु कडू यांनी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे अशी विनंती शेतकºयांनी केली़ यावर बोलताना आ़ बच्चु कडू म्हणाले की, कापसाच्या आंदोलनाने न्याय मिळाला़ पण शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्या इतका न्याय मिळाला नाही़ आजही सरकारी अनास्थेमुळे या आत्महत्या होतच आहेत़ त्याचे लोन आता पश्चिम महाराष्ट्रात पोहचले आहे़ ऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले बँकांचे दलाल, आ़ बच्चु कडू यांचा सोलापूरात आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:11 PM
सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºयांचे वाली नसून बँकांचे दलाल असा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ़ बच्चु कडू यांनी केला़
ठळक मुद्देशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी योजनेला देऊन राजांचा खरा अपमान केलाऊस उत्पादकांना आता न्याय देण्यासाठी ऊस दराचे आंदोलन हाती घ्यावे लागेलऊस उत्पादक शेतकºयांना आता वाली उरला नाही़