शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

बँकांनो, जमा नोटांची माहिती लगेच द्या!

By admin | Published: December 31, 2016 1:27 AM

३0 डिसेंबर रोजी नोटाबंदीची मुदत संपताच जमा झालेल्या नोटांची माहिती त्याच दिवशी तत्काळ रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

मुंबई : ३0 डिसेंबर रोजी नोटाबंदीची मुदत संपताच जमा झालेल्या नोटांची माहिती त्याच दिवशी तत्काळ रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत. चलनातून बाद केलेल्या नोटा बँकांत जमा करण्याची ३0 डिसेंबर रोजी संपली. आता त्याच दिवशी जमा झालेल्या नोटांचा तपशील सादर करा, असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना बजावले आहे. सर्व शाखांमध्ये जमा झालेल्या नोटांची एकत्रित करून ती रिझर्व्ह बँकेकडे सादर करायची आहे. त्याच प्रमाणे जमा झालेल्या जुन्या नोटा ३१ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेत अथवा कोषागारात जमा करण्याचे आदेशही बँकांना दिले आहेत. बँकांना ३१ डिसेंबर रोजी कामकाज संपल्यानंतर रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वत:कडे ठेवता येणार नाही. जिल्हा बँका मात्र १0 नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात आपल्या शाखांत जमा झालेल्या नोटा पुढील आदेश येईपर्यंत स्वत:कडे ठेवू शकतात, असे बँकेने म्हटले. जिल्हा बँकेत जमा झालेल्या नोटांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. (वाणिज्य प्रतिनिधी)माहितीसाठी यंत्रणा८ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या काळात बँकांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा झाल्या. त्या साठविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांना दिले होते. या ५0 दिवसांच्या काळात गोळा झालेल्या सर्व जुन्या नोटांची माहिती सादर करण्यासाठी इंटिग्रेटेड कॉम्प्युटराईज्ड करन्सी अँड मॅनेजमेंट सिस्टिमची व्यवस्था केली आहे.