शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

बाप्पा, राज्याचा विकास होऊ द्या!

By admin | Published: November 05, 2014 12:58 AM

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान, प्रचंड दगदग अन् दररोज नवीन अडचणींचा सामना. या सर्वांसाठी दृढ आत्मविश्वास अन् मन:शांती मिळते ती देवदर्शनातून. मुख्यमंत्री झाल्यानंतर

मुख्यमंत्री फडणवीसांचे टेकडी गणेशाला साकडे नागपूर : मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान, प्रचंड दगदग अन् दररोज नवीन अडचणींचा सामना. या सर्वांसाठी दृढ आत्मविश्वास अन् मन:शांती मिळते ती देवदर्शनातून. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी टेकडी मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राज्यकारभार सुरळीतपणे चालू द्या व राज्याचा विकास होऊ द्या, असे साकडेच यावेळी त्यांनी बाप्पाला घातले.सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री टेकडी गणेश मंदिरात आले. यावेळी परिसरात सुरक्षा व्यवस्था असली तरी अनेक भक्तांना मुख्यमंत्री येथे येणार आहेत, याची कल्पनाच नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या पाहिल्यानंतर कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आली आहे, याची जाणीव उपस्थित नागरिकांना झाली. फडणवीस यांनी माल्यार्पण करून गणेशपूजन केले व नैवेद्य अर्पण केला. दर्शन झाल्यानंतर गणेश मंदिर ट्रस्टतर्फे त्यांचा गणेशाची फ्रेम, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी टेकडी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लखीचंद ढोबळे, सचिव के.सी. गांधी, विश्वस्त प्रमोद देवरणकर, श्रीराम कुळकर्णी, सचिव पुंडलिक जवंजाळ, पुजारी पारखी हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री परत जायला निघाले असताना उत्साही नागरिकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. मुख्यमंत्र्यांनी हसतमुखाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. (प्रतिनिधी)