पुणो : शहराला पाणीपुरवठा करण्या बरोबरच जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनाचा भार असलेल्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणो भरण्याच्या मार्गावर आहेत. या हंगामात या प्रकल्पातील खडकवासला धरण आणि टेमघर धरण भरल्यानंतर आज सायंकाळी पानशेत धरणही 100 टक्के भरले आहे. तर वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर असून, या धरणाचा पाणीसाठा 99 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुणो शहराचा पाणी पुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची समस्या सुटली आहे.
जून महिना उलटूनही या चारही धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा होता. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात ही धरणो भरण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शहर तसेच जिल्ह्यावरही पुढील वर्षी पाण्याचे संकट घोंगावत होते. मात्र, 12 जुलै नंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतील पावसाची सरासरी जवळपास भरून काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत,वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणो जवळपास 98 टक्के भरले आहेत. तसेच या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत चांगला पाऊस सुरू असल्याने या धरणांमधून मोठया प्रमाणात पाणी सोडण्याची शक्यता असल्याने हे नदीमधून जाणारे पाणी पोहचून उजनी धरणात पोहचणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासही त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत जोरदार पाऊस सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. सांयकाळी 5 र्पयत खडकवासला 11 मिलीमीटर, पानशेत आणि वरसगाव प्रत्येकी 28 आणि 29 मिलीमीटर तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कालवा समितीची बैठक पुढील महिन्यात
दरम्यान, ही धरणो 100 टक्के भरली असली तरी, या धरणांमधील किती पाणीसाठा महापालिकेसाठी, तसेच किती पाणी सिंचनासाठी द्यायचे, याबाबत निर्णय घेण्यासाठीची कालवा समितीची बैठक ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसारच पुढील वर्षभराचे पाण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात येणार आहे.
धरणप्रत्यक्ष पाणीसाठाप्रकल्पीय साठाटक्केवारी
खडकवासला1.55 टीएमसी1.97 टीएमसी78 टक्के
पानशेत10.54 टीएमसी10.65 टीएमसी99 टक्के
वरसगाव12.56 टीएमसी12.82 टीएमसी98 टक्के
टेमघर3. 71 टीएमसी3.71 टीएमसी 100 टक्के