ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 10 - राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण जनजागृती अंतर्गत यावर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प तडीस नेण्यात आला. यासर्व वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असा संदेश देण्यासाठी, खामगाव येथे वृक्ष संगोपनासाठी झटणाºया ‘बाप्पां’ची स्थापना करण्यात आली. बाप्पांसह त्यांचे वाहन असलेला उंदीर ही कृतीतून वृक्ष संगोपनाचा संदेश देत आहे.
मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. मात्र संगोपनाअभावी लावलेल्या अनेक वृक्षांची नासधुस होते. यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाला वृक्ष संवर्धनाची आस आहे. असे पर्यावरणपुरक बाप्पा खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तरूणाईचे अध्यक्ष राजेंद्र कोल्हे यांनी साकारले आहेत. अतिशय कल्पकतेतून साकारण्यात आलेले बाप्पा खामगावकरांच्या चर्चेचा विषय बनले असून बाप्पांच्या कृतीतून अनेकजण ‘बोध’ घेतील. यात अजिबात शंका नाही, असा संकल्प गणेशभक्त घेत आहेत.